mr_tw/bible/kt/gentile.md

3.2 KiB

परराष्ट्रीय, परराष्ट्रांना (यहुदितर, विदेशी)

तथ्य:

"परराष्ट्रीय" या शब्दाचा अर्थ असा कोणीतरी जो यहुदी नाही असा होतो. परराष्ट्रीय हे लोक जे याकोबाचे वंशज नव्हते असे होते.

  • पवित्र शास्त्रामध्ये, "असुंती" या शब्दाचा सुद्धा संदर्भ लाक्षणिक अर्थाने परराष्ट्रीयांशी येतो, कारण त्यातील अनेकांनी, जसे इस्राएली त्यांच्या मुलांची सुंता करतात तशी त्यांनी केलेली नव्हती.
  • देवाने यहुदी लोकांना त्याचे विशेष लोक म्हणून निवडले,त्यामुळे ते असा विचार करतात की, परराष्ट्रीय हे बाहेरचे आहेत, जे कधीही देवाचे लोक होऊ शकत नाहीत.
  • यहुद्यांना इतिहासाच्या वेगवेगळ्या काळात "इस्राएली" किंवा "इब्री" असे सुद्धा म्हंटले गेले. दुसऱ्या कोणालाही ते "परराष्ट्रीय" असेच संदर्भित करतात.
  • परराष्ट्रीय ह्याचे भाषांतर "यहुदी नसलेला" किंवा "यहुदितर" किंवा "इस्राएली नसलेला" (जुना करार) किंवा "यहुदी नसलेला" असे केले जाऊ शकते.
  • पारंपारिक दृष्ट्या, यहुदी हे परराष्ट्रीयांबरोबर एकतर मिसळत नाहीत आणि त्यांच्याबरोबर खात सुद्धा नाहीत, ज्याने आद्य मंडळींमध्ये समस्या निर्माण केल्या.

(हे सुद्धा पहा: इस्राएल, याकोब, यहुदी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1471, G1482, G1484, G1672