5.6 KiB
5.6 KiB
इस्राएल, इस्राएली
तथ्य:
"इस्राएल" हा शब्द, देवाने याकोबाला दिलेले एक नाव आहे. ह्याचा अर्थ "त्याने देवाबरोबर संघर्ष केला" असा होतो.
- याकोबाचे वंशज "इस्राएलाचे लोक" किंवा "इस्राएलाचे राष्ट्र" किंवा "इस्राएली" म्हणून ओळखले जाऊ लागले.
- देवाने इस्राएल लोकांच्या बरोबर त्याचा करार स्थापला. ते त्याचे निवडलेले लोक होते.
- इस्राएल राष्ट्रामध्ये बारा वंश होते.
- शलमोन राजा मेल्यानंतर, इस्राएल राष्ट्र दोन राज्यात विभागले गेले: दक्षिणेकडील राज्याला "यहूदा" आणि उत्तरेकडील राज्याला "इस्राएल" असे म्हंटले गेले.
- संदर्भाच्या आधारावर, सहसा "इस्राएल" या शब्दाचे भाषांतर "इस्राएलाचे लोक" किंवा "इस्राएलाचे राष्ट्र" असे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहा: याकोब, इस्राएलाचे राज्य, यहूदा, राष्ट्र, इस्राएलाची बारा कुळे)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 1 इतिहास 10:1-3
- 1 राजे 08:1-2
- प्रेषितांची कृत्ये 02:34-36
- प्रेषितांची कृत्ये 07:22-25
- प्रेषितांची कृत्ये 13:23-25
- योहान 01:49-51
- लुक 24:21
- मार्क 12:28-31
- मत्तय 02:4-6
- मत्तय 27:9-10
- फिलीप्पेकरास पत्र 03:4-5
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
- 08:15 या बारा पुत्रांची संतती ही इस्राएलाचे बारा वंश झाले.
- 09:03 मिस-यांनी इस्राएलांस अनेक इमारतींचे बांधकाम करण्यास व मोठमोठ्या शहरांचे निर्माण करण्यास सक्ती केली.
- 09:05 एका इस्राएली स्त्रीने एका मुलास जन्म दिला.
- 10:01 ते म्हणाले, "इस्राएलाचा देव असे म्हणतो, 'माझ्या लोकांना जाऊ द्या!" फारोने त्यांचे ऐकले नाही.
- 14:12 पण तरीही इस्राएल लोकांनी देवाविरूद्ध व मोशेविरूद्ध कुरकुर केली.
- 15:09 त्या दिवशी इस्राएलाच्या बाजूने देव स्वतः लढला. त्याने अमोरी सैनिकांमध्ये गोंधळ निर्माण केला व त्यांच्यावर मोठ्या गारा पाडल्या, ज्यामध्ये अनेक अमोरी मरण पावले.
- 15:12 या लढाईनंतर देवाने __इस्राएलाच्या __ प्रत्येक वंशास वचनदत्त देशाची वाटणी करुन दिली. त्यानंतर देवाने इस्राएलाच्या सर्व सीमेवर शांती प्रस्थापित केली.
- 16:16 मग देवाने इस्त्राएलांस पुन्हा शासन केले, कारण त्यांनी मूर्तिपूजा केली होती.
- 43:06 "अहो इस्राएल लोकांनो, येशूने देवाच्या शक्तिद्वारे अनेक चिन्हे व अद्भुत कार्ये केली, जी तुम्ही स्वतः डोळ्याने पाहिली व तुम्हाला माहीत आहेत.
Strong's
- Strong's: H3478, H3479, H3481, H3482, G935, G2474, G2475