mr_tw/bible/kt/jew.md

4.1 KiB
Raw Blame History

यहुदी

तथ्य:

यहुदी हे लोक अब्राहामाचा नातू याकोबाचे वंशज होते. "यहुदी" हा शब्द "यहूदा" या शब्दापासून आला.

  • इस्राएलींना लोक "यहुदी" म्हणून बोलवू लागले, जेंव्हा ते बाबेलाच्या बंदिवासातून यहुदाला परत आले.
  • येशू मसिहा हा यहुदी होता. तथापि, यहुदी धार्मिक पुढाऱ्यांनी येशूला नाकारले आणि त्याला मारले जावे अशी मागणी केली.
  • बऱ्याचदा "यहुदी" या वाक्यांशाचा संदर्भ यहूद्यांच्या पुढाऱ्याशी येतो, संपूर्ण यहुदी लोकांशी नाही. त्या संदर्भामध्ये, काही भाषांतरे हे अधिक स्पष्ट करण्यासाठी "पुढारी" हा शब्द जोडतात.

(हे सुद्धा पहा: अब्राहम, याकोब, इस्राएल, बाबेल, यहुदी पुढारी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 20:11 इस्त्रायली लोक आता यहूदी या नावाने ओळखले जाऊ लागले व त्यांच्यापैकी पुष्कळ लोक आपल्या आयुष्यभर बाबेलमध्येच राहिले.
  • 20:12 अशा प्रकारे सत्तर वर्षाचा हद्दपारी संपवून यहूद्यांचा छोटा समूह यहूदातील यरुशलेमेस परतला.
  • 37:10 हा चमत्कार पाहून अनेक यहूद्यांनी येशूवर विश्वास ठेविला.
  • 37:11 परंतु यहूद्यांचे धार्मिक पुढारी येशूचा द्वेष करु लागले, व येशू आणि लाजर यांना जीवे मारण्यासाठी योजना आखू लागले.
  • 40:02 पिलाताने त्यांना आज्ञा दिली की त्यांनी यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी वधस्तंभाच्या वर येशूच्या डोक्यावर लावावी.
  • 46:06 लगेच शौल दिमिष्कामध्ये असणाऱ्या यहूद्यांना प्रचार करू लागला व म्हणाला, "येशू हाच देवाचा पुत्र आहे."

Strong's

  • Strong's: H3054, H3061, H3062, H3064, H3066, G2450, G2451, G2452, G2453, G2454