mr_tw/bible/kt/christ.md

8.1 KiB
Raw Blame History

ख्रिस्त, मसिहा

तथ्य:

"मसिहा" आणि "ख्रिस्त" या शब्दांचा अर्थ "एक अभिषिक्त" आणि त्याचा संदर्भ येशुशी, देवाच्या पुत्राशी आहे.

  • "मसिहा" आणि "ख्रिस्त" हे दोन्ही शब्द नवीन करारामध्ये येशूच्या संदर्भात वापरले आहेत, ज्याला देव जो पिता त्याने त्याच्या लोकांवर राज्य करण्यासाठी आणि त्यांना पाप आणि मृत्यू पासून वाचवण्यासाठी नियुक्त केले आहे.
  • जुन्या करारामध्ये, संदेष्ट्यानी मसिहा पृथ्वीवर येण्याच्या शेकडो वर्ष आधी त्याच्याबद्दल भविष्यवाण्या लिहून ठेवल्या.
  • अनेकदा "अभिषिक्त (एक)" या शब्दाचा अर्थ जुन्या करारामध्ये मासिहाच्या संदर्भात वापरला जातो, जो येणार होता.
  • येशूने यापैकी अनेक भविष्यवाण्या पूर्ण केल्या आणि अनेक चमत्कारिक कृत्यांनी सिद्ध केले की तोच मसिहा आहे; उरलेल्या भविष्यवाण्या तो जेंव्हा परत येईल तेंव्हा पूर्ण होतील.
  • "ख्रिस्त" हा शब्द हा सहसा शीर्षक म्हणून वापरण्यात आला, जे की, "ख्रिस्त" आणि "ख्रिस्त येशू."
  • "ख्रिस्त" हा शब्द त्याच्या नावाचा एक भाग म्हणून देखील वापरला जातो, जसे की, "येशू ख्रिस्त"

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "एक अभिषिक्त" किंवा "देवाचा अभिषिक्त रक्षणकर्ता" या अर्थाचे शब्द वापरून केले जाऊ शकते.
  • बऱ्याच भाषा एक लिप्यंतरणयुक्त शब्द वापरतात जो "ख्रिस्त" किंवा "मशीहा" या शब्दांसारखा दिसतो किंवा ऐकण्यास येतो. (पहाः अज्ञात कसे भाषांतरित करायचे
  • लिप्यंतरण या शब्दाची व्याख्या, "ख्रिस्त, एक अभिषिक्त" या शब्दाने केली जाऊ शकते.
  • संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हे कसे भाषांतरित केले आहे, यानुसार सुसंगत रहा, जेणेकरून हे स्पष्ट होईल की त्याच शब्दांचा संदर्भ दिला जात आहे.
  • "मसिहा" आणि "ख्रिस्त" या शब्दांचे भाषांतर जेथे दोन्ही शब्द एकाच माजकुरांमध्ये एकत्र येतात (जसे की योहान 1:41) तेथे चागले काम करतात याची खात्री करा.

(हे सुद्धा पहाः नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: देवाचा पुत्र, दावीद, येशू, अभिषेक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:07 मशिहा हा देवाचा निवडलेला अभिषिक्त जगातील लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविणारा होता.
  • 17:08 परंतु मशिहा येण्याच्या अगोदर इस्त्रायली लोकांना जवळ जवळ 1000 वर्षे त्याची वाट पाहावी लागली.
  • 21:01 आरंभापासूनच, देवाने मसिहाला पाठविण्याची योजना बनविली होती.
  • 21:04 देवाने दाविद राजास अभिवचन दिले की त्याच्याच वंशातील एक जण देवाच्या लोकांवर सर्वकाळ राज्य करील.
  • 21:05 मसिहा या नव्या कराराचा आरंभ करील.
  • 21:06 देवाच्या संदेष्टयांनीही सांगितले होते की मसिहा हा एक संदेष्टा, याजक, आणि राजा असेल.
  • 21:09 यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.
  • 43:07 या घटनेद्वारे ही भविष्यवाणी पूर्ण होते, ‘तू आपल्या पवित्रास कबरेमध्ये कुजू देणार नाहीस.
  • 43:09 परंतु आता तुम्हाला कळू द्या की ज्याला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे!"
  • 43:11 पेत्र त्यांना म्हणाला, "तुम्हांपैकी प्रत्येकाने आपआपल्या पापांचा पश्चाताप करुन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्तिस्मा घ्यावा, म्हणजे देव तुम्हास तुमच्या पापांची क्षमा करील.
  • 46:06 शौलाने तर्कशुद्ध संभाषण करून यहूद्यांना येशू हा मसिहा असल्याचे सिद्ध केले.

Strong's

  • Strong's: H4899, G3323, G5547