mr_tw/bible/names/david.md

6.3 KiB

दावीद

तथ्य:

दावीद हा इस्राएलचा दुसरा राजा होता आणि त्याने देवावर प्रेम आणि त्याची सेवा केली. स्तोत्रसंहिता या पुस्तकाचा तो मुख्य लेखक होता.

  • जेंव्हा दावीद तरुण मुलगा होता, जो आपल्या कुटुंबाची मेंढरे चारीत असे, देवाने त्याला इस्राएलचा नंतरचा राजा होण्यासाठी निवडले.
  • दावीद महान योद्धा बनला आणि त्याने त्याच्या शत्रूबरोबरच्या युद्धात इस्राएली सैन्यांचे नेतृत्व केले. त्याने गल्याथ नावाच्या पलीष्ट्याला हरवले हे सर्वज्ञात आहे.
  • शौल राजाने दाविदाला मारण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याला वाचवले, आणि शौलाच्या मृत्युनंतर त्याला राजा बनवले.
  • दाविदाने भयानक पाप केले, पण त्याने पश्चाताप केला आणि देवाने त्याला माफ केले.
  • येशू, मसिहा, त्याला "दाविदाचा पुत्र" असे म्हणण्यात आले, कारण तो दावीद राजाचा वंशज होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हेही पहाः गल्याथ, पलिष्टी, शौल

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 17:02 देवाने शौलानंतर दाविद नावाच्या एका इस़्त्रायली तरुणांस राजा होण्यास निवडले. दाविद हा बेथलेहेम नगरातील एक मेंढपाळ होता. दाविद हा देवाचे भय बाळगणारा नम्र व धार्मिक पुरुष होता.
  • 17:03 दाविद एक महान योद्धा व पुढारी झाला. दाविद लहान असतानाच त्याने गल्याथ नावाच्या एका राक्षसी मुनष्याबरोबर युद्ध केले. गल्याथ हा एक प्रशिक्षित, बलाढय व तीन मीटर उंचीचा सैनिक होता!
  • 17:04 लोक दाविदाची प्रशंसा करत असेलेले पाहूल शौलाला त्याचा हेवा वाटू लागला. शौलाने अनेकदा त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण दाविदाने स्वत:स शौलापासून लपविले.
  • 17:05 देवाने दाविदास आशीर्वादित केले व तो यशस्वी झाला. दाविदाने अनेक युद्ध केले व देवाने त्यास इस्त्रायलांच्या शत्रूस पराजित करण्यास सहाय्य केले.
  • 17:06 दाविदाला एक मंदिर बांधावयाचे होतो ज्यामध्ये सर्व इस्राएल लोक देवाची उपासना व अर्पणे करु शकतील.
  • 17:09 दाविदाने न्यायाने व विश्वासूपणाने अनेक वर्षे राज्य केले व देवाने त्यास आशीर्वादित केले. * तथापी, त्याच्या आयुष्याच्या शेवटी त्याने देवाविरुध्द भयंकर पाप केले.
  • 17:13 दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने नाथान संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले. दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास क्षमा केली. नंतर मरेपर्यंत दाविदाने अगदी कठिण प्रसंगी देखिल देवाच्या आज्ञा पाळल्या.

Strong's

  • Strong's: H1732, G1138