mr_tw/bible/kt/jesus.md

9.5 KiB
Raw Blame History

येशू, येशू ख्रिस्त, ख्रिस्त येशू

तथ्य:

येशू देवाचा पुत्र आहे. "येशू" या नावाचा अर्थ "परमेश्वर वाचवतो." "ख्रिस्त" हे एक शीर्षक आहे आणि त्याचा अर्थ "अभिषिक्त" असा आहे आणि तो मसिहासाठीचा आणखी एक शब्द आहे.

  • ही दोन्ही नावे अनेकदा "येशू ख्रिस्त" किंवा "ख्रिस्त येशू" म्हणून एकत्र केली जातात. ही नावे या गोष्टीवर भर देतात की, मसिहा देवाचा पुत्र आहे, जो लोकांना त्यांच्या पापांबद्दल सदासर्वकाळ शिक्षा होण्यापासून वाचविण्यासाठी आला होता.
  • चमत्कारिक मार्गाने, पवित्र आत्मा देवाच्या सार्वकालिक पुत्राला मानव म्हणून जन्मास येण्यास कारणीभूत झाला. त्याची आईला त्याला "येशू" म्हणून बोलवण्यासाठी एका देवदूताद्वारे सांगण्यात आले, कारण लोकांना त्यांच्या पापांपासून वाचविण्यासाठी हे पूर्वीपासून योजले होते.
  • येशूने अनेक चमत्कार केले ज्याने प्रकट केले की तो देव आहे आणि तो ख्रिस्त किंवा मसिहा आहे.

भाषांतर सूचना

  • बऱ्याच भाषांमध्ये "येशू" आणि "ख्रिस्त" या शब्दांचे अशाच प्रकारे शब्दलेखन केले जाते, ज्याचे उच्चारण किंवा शब्दाचे लेखन शक्य तितक्या मूळ शब्दांशी मिळते जुळते असेल. उदाहरणार्थ, "जेसुक्रिस्टो," "जेजस क्रिस्टस," "येसुस क्रिस्टस", आणि "हेसुक्रिस्टो" अशा काही पद्धतीनी या नावांचे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरण केले आहे.
  • "ख्रिस्त" या शब्दासाठी काही भाषांतरकार केवळ "मसिहा" या शब्दाचे केवळ काही प्रकार वापरण्यास प्राधान्य देतात.
  • हे देखील लक्षात घ्या की या नावांची स्थानिक किंवा राष्ट्रीय भाषेत शब्दलेखन कसे केले गेले आहे.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

[हे सुद्धा पहा: ख्रिस्त, देव, देव पिता, महायाजक, देवाचे राज्य मरीया, तारणहार, देवाचा पुत्र

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:04 देवदूत म्हणाला,‘‘तू गर्भवती होऊन तूला पुत्र होईल. तू त्याचे नाव येशू ठेव
  • 23:02 व त्याचे नाव येशू (अर्थात, ‘देव तारितो’) असे ठेव, कारण तो लोकांना त्यांच्या पापांपासून सोडविल.
  • 24:07 तेंव्हा योहानाने त्याला बाप्तिस्मा दिला, जरी येशूने काहीच पाप केले नव्हते.
  • 24:09 एकच देव आहे. परंतु जेव्हा योहानाने येशूला बाप्तिस्मा दिला, तेंव्हा त्याने देवपिता बोलत असलेला पाहिला, देवपुत्र येशू पाहिला, आणि पवित्र आत्मा पाहिला.
  • 25:08 अशा प्रकारे येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, म्हणून सैतान त्याला सोडून तेथून निघून गेला.
  • 26:08 मग येशू गालिलातील प्रांतामधून प्रवास करत गेला व पुष्कळसे लोक त्याकडे आले. त्यांनी त्याच्याकडे अनेक आजारी, अपंग, आंधळे ,पांगळे, बहिरे, व मुके लोक घेऊन आले आणि येशूने त्यांना बरे केले.
  • 31:03 तेंव्हा येशू प्रार्थना संपवून शिष्यांकडे आला. तो समुद्रावरुन पाण्यावर चालत त्यांच्या नावेकडे येत होता!
  • 38:02 त्याला ठाऊक होते की यहूदी पुढारी येशू हा मशीहा आहे हे नाकारत होते व त्यास मारण्याचा कट रचत होते.
  • 40:08 आपल्या मृत्यूद्वारे, येशूने लोकांसाठी देवाकडे जाण्याचा मार्ग खुला करुन दिला.
  • 42:11 मग येशू स्वर्गात गेला व मेघाने त्याला त्यांच्या दृष्टिआड केले. सर्व गोष्टींवर अधिकार चालवण्यासाठी येशू देवाच्या उजवीकडे बसलेला आहे .
  • 50:17 येशू आणि त्याचे लोक नवीन पृथ्वीवर राहतील, व तो अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टींवर सर्वकाळ राज्य करेल. तो त्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील व त्या ठिकाणी कुठलाही त्रास, शोक, रडणे, दुष्टाई, दुःख किंवा मृत्यु नसेल. येशू आपल्या राज्यामध्ये शांतीने व न्यायाने व राज्य करील व तो आपल्या लोकांबरोबर सर्वकाळ राहील.

Strong's

  • Strong's: G2424, G5547