mr_tw/bible/kt/authority.md

4.3 KiB

अधिकार, अधिकारी

व्याख्या:

"अधिकार" या शब्दाचा संदर्भ एखाद्याच्या दुसऱ्या व्यक्तीवरील प्रभाव आणि नियंत्रण शक्तीचा आहे.

  • राजे आणि इतर व्यवस्था पाहणाऱ्या शासकांकडे ज्या लोकांच्यावर ते राज्य करतात त्यांच्यावर अधिकार असतो.
  • "अधिकारी" या शब्दाचा संदर्भ इतरांवर अधिकार असलेल्या लोकांना, सरकार किंवा संस्थांशी होऊ शकतो.
  • शब्द "अधिकारी" हा आत्मिक माणसांना सुद्धा संदर्भित करू शकता ज्यांना अशा माणसांवर अधिकार आहे ज्यांनी स्वतःला परमेश्वराच्या अधिकाराखाली स्वतःला समर्पित केलेले नाही.
  • मालक आपल्या सेवकांवर किंवा गुलामांवर अधिकार गाजवतात. * पालकांचा त्यांच्या मुलांवर अधिकार असतो.
  • सरकारकडे त्यांच्या नागरिकांना संचालित करणारे कायदे करण्याचा अधिकार किंवा हक्क आहे.

भाषांतर सूचना

  • "अधिकार" या शब्दाचे "नियंत्रण" किंवा "योग्य" किंवा "योग्यता" म्हणून सुद्धा भाषांतर केले जाऊ शकते.
  • कधीकधी "अधिकार" हा शब्द "सत्ता" या अर्थाने वापरला जातो.
  • जेव्हा "अधिकारी" हा शब्द लोकांच्या किंवा लोकांवर शासन करणारी संस्था यांना संदर्भित करण्यासाठी वापरला जातो, तेव्हा हे "नेते" किंवा "शासक" किंवा "सत्ता" म्हणून देखील भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "स्वतःच्या अधिकाराने" या वाक्यांशाचे भाषांतर "नेतृत्व करण्याच्या त्याच्या स्वत: च्या हक्काने" किंवा "त्याच्या स्वत:च्या योग्यतेवर आधारित" असे भाषांतरित केले जाऊ शकते.
  • "अधिकाराखाली" या शब्दाचे भाषांतर "आज्ञा पालन करण्यासाठी जबाबदार" किंवा "इतरांच्या आज्ञांचे पालन करणे" असे केले जाऊ शकते."

(हे सुद्धा पहा: नागरिक, आदेश, पालन, सत्ता, शासक)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H8633, G831, G1413, G1849, G1850, G2003, G2715, G5247