mr_tw/bible/kt/almighty.md

2.7 KiB

सर्वसमर्थ

तथ्य:

"सर्वसमर्थ" या शब्दाचा शब्दशः अर्थ "सर्व-शक्तिशाली" असा होतो; पवित्र शास्त्रामध्ये, तो नेहमी देवला सूचित करतो.

  • "सर्वसमर्थ" किंवा "परात्पर" या शीर्षकाचा उल्लेख परमेश्वराच्या संदर्भात आहे आणि प्रकट करतो की त्याच्याजवळ सर्व गोष्टींवर संपूर्ण सत्ता आणि अधिकार आहे.
  • परमेश्वराचे वर्णन करण्यासाठी "सर्वसमर्थ देव" आणि "परात्पर देव" आणि "सर्वशक्तिमान देव" आणि "देव परमेश्वर सर्वशक्तिमान" हे शब्द वापरण्यात आले आहेत.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "सर्व-शक्तिशाली" किंवा "पूर्णपणे सामर्थ्यवान" किंवा "देव, जो पूर्णपणे शक्तिशाली आहे" असे होऊ शकते.
  • "प्रभु देव सर्वसमर्थ" या शब्दाचे अनुवाद करण्याचे मार्ग म्हणजे "देव, सामर्थ्यवान शासक" किंवा "सर्वोच्च पराक्रमी प्रभु" किंवा "परात्पर देव जो सर्व गोष्टींवर ताबा ठेवतो."

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: परमेश्वर, प्रभू, शक्ती)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: