mr_tw/bible/kt/lord.md

11 KiB

स्वामी, परमेश्वर, प्रभु, सर

व्याख्या:

पवित्र शास्त्रामध्ये “स्वामी” हा शब्द सामान्यत: एखाद्याला सूचित करतो ज्याची मालकी किंवा इतर लोकांवर अधिकार आहे. पवित्र शास्त्रामध्ये, हा शब्द देवाला समाविष्ट करून, अनेक प्रकारच्या लोकांना उद्देशून वापरला आहे.

  • येशूला संबोधित करताना किंवा गुलामांची मालकी असलेल्या एखाद्याचा उल्लेख करताना कधीकधी “प्रभु” हा शब्द अनुवादित केला जातो.
  • काही इंग्रजी आवृत्त्या या संज्ञेला “सर” म्हणून भाषांतरित करतात ज्यात कोणीतरी सभ्यपणे एखाद्याला उच्च पदावर संबोधित करीत आहे.

जेव्हा “परमेश्वर” या शब्दाला मोठ्या अक्षरात लिहिले जाते तेव्हा ती एक पदवी असते जी देवाला सूचित करते. (तथापि, लक्षात घ्या, की जेव्हा हे एखाद्याला संबोधित करण्याच्या रूपात वापरले जाते किंवा वाक्याच्या सुरूवातीस येते तेव्हा त्याला मोठ्या अक्षरात लिहिले जावू शकते आणि "गुरुजी" किंवा "प्रभु" असा त्याचा अर्थ असू शकतो.)

  • जुन्या करारामध्ये हा शब्द "सर्वशक्तिमान परमेश्वर देव " किंवा "यहोवा परमेश्वर" किंवा "यहोवा आमचा परमेश्वर" अशा अभिव्यक्तींमध्ये देखील वापरला जातो.

  • नवीन करारात, प्रेषितांनी हा शब्द “प्रभु येशू” आणि “प्रभु येशू ख्रिस्त” या अविर्भावात वापरले आहे, जे सांगते की येशु हा देव आहे

  • नवीन करारात “परमेश्वर” हा शब्द एकटाच देवासाठी थेट संदर्भ म्हणून वापरला जातो, खासकरुन जुन्या कराराच्या उल्लेखामध्ये. उदाहरणार्थ, जुन्या करारातील मजकुरामध्ये “परमेश्वराच्या नावाने येणारा धन्यवादित आहे” आणि नवीन कराराच्या मजकुरामध्ये “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादीत आहे “असे लिहीले आहे.

  • यूएलटी आणि यूएसटी मध्ये, “परमेश्वर” ही पदवी केवळ "प्रभु" असा अर्थ असलेल्या वास्तविक इब्री आणि ग्रीक शब्दांचे भाषांतर करण्यासाठी वापरली जाते. हे देवाच्या नावाचे भाषांतर म्हणून कधीच वापरले जात नाही (यहोवा), जसे की बर्‍याच अनुवादांत केले आहे.

  • काही भाषा “परमेश्वर” या संज्ञेला “प्रभु” किंवा “शासक” किंवा काही अन्य संज्ञेद्वारे भाषांतर करतात जी मालकी किंवा सर्वोच्च नियम संप्रेषित करते.

  • योग्य संदर्भात, बर्‍याच भाषांतरे या शब्दाच्या पहिल्या अक्षराला मोठे करतात जेणेकरुन वाचकांना हे स्पष्ट होईल की हे देवाला संदर्भित करणारे शीर्षक आहे.

जुन्या करारातील उल्लेख असलेल्या नवीन कराराच्या ठिकाणी, “परमेश्वर देव” असा शब्द वापरला जाऊ शकतो, हे स्पष्ट करण्यासाठी की हा परमेश्वराचा देवाचा

भाषांतरातील सूचना:

  • जेव्हा तो शब्द गुलामांची मालकी असलेल्या व्यक्तीस संदर्भित करतो तेव्हा या शब्दाला “प्रभु” या शब्दाबरोबरीने भाषांतरित केले जाऊ शकते. हे सेवकाद्वारे ज्याच्यासाठी त्याने काम केले आहे त्या व्यक्तीला संबोधित करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते.
  • जेव्हा येशूचा संदर्भ असतो, जेव्हा संदर्भ दर्शवितो की वक्ता त्याला धार्मिक शिक्षक म्हणून पाहत असेल तर त्याचे भाषांतर “प्रभु” या सारख्या एका धार्मिक शिक्षकाच्या आदरणीय उल्लेखाने केले जाऊ शकते.
  • जर येशूला संबोधित करणारी व्यक्ती त्याला ओळखत नसेल तर, “स्वामी” हे भाषांतर “गुरुजी” यासारख्या आदराच्या स्वरुपात केले जाऊ शकते. हे भाषांतर इतर संदर्भांमध्ये देखील वापरले जाईल ज्यात एखाद्या पुरुषाला सभ्य उल्लेखाने बोलविले जाते.
  • देव पिता किंवा येशूला संदर्भित करताना या शब्दाला इंग्रजीमध्ये “परमेश्वर” (मोठी लिपि) असे लिहिलेली, पदवी मानली जाते.

(हे देखील पाहा: [देव], [येशू], [शासक], [यहोवा])

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [उत्पत्ती 39:02]
  • [यहोशवा 03:9-11]
  • [स्तोत्रसंहीता 086:15-17]
  • [यिर्मया 27:04]
  • [विलापगीत 02:02]
  • [यहेज्केल 18:29]
  • [दानिएल 09:09]
  • [दानिएल 09:17-19]
  • [मलाखी 03:01]
  • [मत्तय 07:21-23]
  • [लूक 01:30-33]
  • [लूक 16:13]
  • [रोमकरांस पत्र 06:23]
  • [इफिसकरांस पत्र 06:9]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 02:9-11]
  • [कलस्सैकरांस पत्र 03:23]
  • [इब्री लोकांस पत्र12:14]
  • [याकोब 02:01]
  • [1 पेत्र 01:03]
  • [यहुदाचे पत्र 01:05]
  • [प्रकटीकरण15:04]

पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:

  • [25:05] पण येशूने शास्त्रवचनांचा हवाला देऊन सैतानाला उत्तर दिले. तो म्हणाला, “देवाच्या वचनात असे लिहीले आहे, तो आपल्या लोकांना आज्ञा देतो की,“ आपला देव परमेश्वर ह्याची परीक्षा पाहू नका.”
  • [25:07] येशू म्हणाला, “सैताना, माझ्यापासून दूर जा. देवाच्या वचनात तो आपल्या लोकांना आज्ञा देतो, ‘फक्त तुमचा देव परमेश्वर याचीच उपासना करा आणि त्याचीच सेवा करा.”
  • [26:03] हे परमेश्वराच्या कृपेचे वर्ष आहे.
  • [27:02] नियमाच्या तज्ञाने उत्तर दिले की, देवाचा नियम म्हणतो, “आपल्या अंतकरणाने, आत्म्याने, सामर्थ्याने आणि बुध्दीने आपला देव परमेश्वर यावर प्रेम करा.
  • [31:05] मग पेत्र येशूला म्हणाला, “प्रभुजी, जर तू असशील तर मला पाण्यावर तुझ्याकडे येण्यास सांग.”
  • [43:09] “परंतु हे निश्चितपणे जाणून घ्या की देवाने येशूला“ प्रभु आणि मसीहा ”करून ठेवले आहे!”
  • [47:03] या भुताद्वारे तिने लोकांच्या भविष्याचा अंदाज लावला, तिने तिच्या __ प्रभुंसाठी__ एक ज्योतिषी म्हणून खूप पैसे कमविले.
  • [47:11] पौलाने उत्तर दिले, "__प्रभु__येशूवर विश्वास ठेवा, आणि तू व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच113, एच136, एच1167, एच1376, एच4756, एच7980, एच8323, जी203, जी634, जी962, जी1203, जी2962