5.9 KiB
5.9 KiB
शक्ती, सामर्थ्यवान, सामर्थ्याने
व्याख्या:
"सामर्थ्य" या शब्दाचा अर्थ असा की बर्याचदा मोठ्या ताकदीने गोष्टी करण्याच्या किंवा गोष्टी घडवून आणण्याची क्षमता. “शक्ती” ही संज्ञा लोक किंवा विचारांना संदर्भित करते ज्यामध्ये गोष्टी घडवून आणण्याची मोठी क्षमता असते.
- “देवाचे सामर्थ्य” म्हणजे प्रत्येक गोष्ट करण्याची देवाच्या क्षमता, विशेषत: अशा गोष्टी ज्या लोकांना करणे शक्य नाही.
- देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा पूर्ण अधिकार आहे.
- देव आपल्या लोकांना त्याच्या इच्छेनुसार कार्य करण्याची शक्ती देतो, जेणेकरून जेव्हा ते लोकांना बरे करतात किंवा इतर चमत्कार करतात तेव्हा ते देवाच्या सामर्थ्याने हे करतात.
- कारण येशू आणि पवित्र आत्मा देखील देव आहेत, त्यांच्यातही हे समान सामर्थ्य आहे.
भाषांतरातील सूचना:
- संदर्भानुसार, "शक्ती" या शब्दाचे भाषांतर "क्षमता" किंवा "सामर्थ्य" किंवा "ऊर्जा" किंवा "चमत्कार करण्याची क्षमता" किंवा "नियंत्रण" असे देखील केले जाऊ शकते.
- “शक्ती” या शब्दाचा अनुवाद करण्याच्या संभाव्य मार्गांमध्ये “शक्तिशाली” किंवा “नियंत्रित करणारा आत्मा” किंवा “इतरांवर नियंत्रण ठेवणारे” यांचा समावेश असू शकतो.
(हे देखील पाहा: [पवित्र आत्मा], [येशू], [चमत्कार])
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- [1 थेस्सलनीकाकरांस पत्र01:05]
- [कलस्सैकरांस पत्र 01:11-12]
- [उत्पत्ती 31:29]
- [यिर्मया 18:21]
- [यहुदाचे पत्र 01:25]
- [शास्ते 02:18]
- [लूक 01:17]
- [लूक 04:14]
- [मत्तय 26:64]
- [फिलिप्पैकरांस पत्र 03:21]
- [स्तोत्रसंहीता 080:02]
पवित्र शास्त्राच्या कथांतील उदाहरणे:
- [22:05] देवदूताने स्पष्ट केले की, “पवित्र आत्मा तुझ्याकडे येईल, आणि देवाची __शक् __ तुझ्यावर सावली करील. मग देवाचा पुत्र, बाळ पवित्र असेल. ”
- [26:01] सैतानाच्या मोहांवर विजय मिळविल्यानंतर, येशू पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो राहत असलेल्या गालील प्रदेशात परतला.
- [32:15] येशूला लगेच कळाले की त्याच्यातून शक्ती निघाली आहे.
- [42:11] येशू मेलेल्यांतून उठल्याच्या चाळीस दिवसांनंतर, त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “जेव्हा पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, माझ्या पिता तुम्हाला सामर्थ्य देईपर्यंत यरुशलेममध्ये राहा.”
- [43:06] इस्राएल लोकांनो, येशू हा एक मनुष्य होता ज्याने देवाच्या __सामर्थ्याने __ अद्भुत चिन्ह आणि चमत्कार केले, जसे की तुम्ही पाहिले आणि अगोदरच तुम्हाला ते माहीत आहे.”
- [44:08] पेत्राने उत्तर दिले, “ हा मनुष्य जो तुमच्या समोर उभा आहे तो येशु मसीहाच्या शक्तीने बरा झाला आहे.
शब्द संख्या:
- स्ट्रॉन्गचे: एच410, एच1369, एच1370, एच2220, एच2393, एच2428, एच2429, एच2632, एच3027, एच3028, एच3581, एच4475, एच4910, एच5794, एच5797, एच5808, एच6184, एच7786, एच7980, एच7981, एच7983, एच7989, एच8280, एच8592, एच8633, जी1411, जी1415, जी1754, जी1756, जी1849, जी1850, जी2159, जी2478, जी2479, जी2904, जी3168