mr_tw/bible/other/thief.md

4.2 KiB

चोर, लुटणे, लुटले, लुटारू, लुट, लुटले

तथ्य:

"चोर" या शब्दाचा संदर्भ अशा व्यक्तीशी आहे, जो इतर लोकांपासून पैसे किंवा मालमत्ता चोरतो. "चोर" या शब्दाचे अनेकवचन रूप "चोर (लुटारू)" असे होते. "लुटारू" हा शब्द सहसा चोराच्या संदर्भात येतो, जो ज्या लोकांपासून तो चोरी करत आहे, त्या लोकांना शारीरिकदृष्ट्या हानी किंवा धोका पोहोचवतो.

  • येशूने शोमरोनी मनुष्याची बोधकथा सांगितली, ज्यामध्ये त्याने लुटारूंनी हल्ला केलेल्या यहुदी मनुष्याची काळजी घेतली होती. लुटारूंनी यहुदी मनुष्याकडून पैसे आणि कपडे चोरण्यापुर्वी त्याला मारले होते आणि घायाळ केले होते.
  • चोर आणि लुटारू दोन्ही चोरी करण्यासाठी अचानक येतात, जेंव्हा लोकांनी त्यांची अपेक्षा पण केलेली नसते. ते जे काही करत आहेत ते लपविण्यासाठी, ते बऱ्याचदा अंधाराचे कवच वापरतात.
  • लाक्षणिक अर्थाने, नवीन करार शैतानाचे वर्णन चोर असा करतो, जो चोरी, हत्या आणि नाश करण्यासाठी येतो. ह्याचा अर्थ देवाच्या लोकांनी त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचे थांबवण्याचा प्रयत्न करण्याची योजना शैतान करत असतो. जर तो ह्यामध्ये यशस्वी झाला, तर शैतान त्यांच्यापासून चांगल्या गोष्टी चोरून घेऊ शकतो, ज्या देवाने त्यांच्यासाठी योजून ठेवल्या आहेत.
  • येशूने त्याचे अचानक येण्याची तुलना लोकांपासून चोरी करायला अचानक येणाऱ्या चोराशी केली. जसे चोर अशा वेळी येतो, जेंव्हा लोकांनी त्याची अपेक्षा पण केलेली नसते, तसेच येशूसुद्धा अशा वेळी येईल, जेंव्हा लोकांनी त्याची अपेक्षा केलेली नसेल.

(हे सुद्धा पहा: आशीर्वाद, गुन्हा, वधस्तंभावर खिळणे, अंधकार, नाश करणारा, सामर्थ्य, शोमरोन, शैतान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: