mr_tw/bible/other/darkness.md

4.9 KiB

अंधकार (अंधार)

व्याख्या:

अंधार या शब्दाचा शब्दशः अर्थ प्रकाशाची अनुपस्थिती. या शब्दाचे अनेक लाक्षणिक अर्थ देखील आहेत:

  • रूपकाच्या अर्थाने, "अंधार" या शब्दाचा अर्थ "अशुद्धता" किंवा "वाईट" किंवा "आत्मिक आंधळेपणा" असा होतो.
  • ह्याला, काहीतरी जे पाप आणि नैतिक भ्रष्टाचाराशी संबंधित आहे, ते संदर्भित करण्यासाठी देखील वापरतात.
  • "अंधकाराचे साम्राज्य" या अभिव्यक्तीचा संदर्भ त्या सगळ्याशी आहे, जे वाईट आणि सैतानाच्या शासनाखाली आहे.
  • "अंधार" हा शब्द मृत्यूसाठी रूपकाच्या अर्थाने देखील वापरण्यात आला आहे. (पहा: रूपक
  • जे लोक देवाला ओळखत नाहीत ते "अंधारात जीवन जगत आहेत," ह्याचा अर्थ त्यांना नीतिमत्त्व समजत नाही किंवा त्यांचे पालन करत नाहीत.
  • देव प्रकाश (धार्मिकता) आहे आणि अंधकाराला (दुष्टाला) त्याच्यावर विजय मिळवता येत नाही.
  • जे लोक देवाला नाकारतात, त्यांच्या शिक्षेच्या जागेला काहीवेळा "बाह्य अंधार" असे संदर्भित केले जाते.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे शब्दशः भाषांतर, प्रकल्पित भाषेतील अशा शब्दाने ज्याचा संदर्भ प्रकाशाच्या अनुपस्थितीशी आहे, त्याने करणे सर्वोत्तम राहील. ही एक अशी संज्ञा असू शकते, जिचा संदर्भ अंधकाराच्या खोलीशी आहे, जिथे प्रकाश नाही किंवा दिवसाची अशी वेळ आहे जेंव्हा तिथे प्रकाश नसतो.
  • लाक्षणिक अर्थाच्या उपयोगासाठी, प्रकाशाच्या तुलनेत अंधाराची प्रतिमा ठेवणे देखील महत्वाचे आहे, जसे चांगुलपणा आणि सत्याच्या विरोधात दुष्टता आणि फसवणूक यांचा उल्लेख करण्याची पद्धत आहे.
  • संदर्भावर आधारित, ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये "रात्रीचा अंधार" ("दिवसाचा प्रकाश" ह्याचा विरुद्ध) किंवा "काहीही न दिसणे, रात्रीच्या वेळेसारखे" किंवा "दुष्ट, अंधाराच्या जागेसारखा" ह्यांचा समावेश होतो.

(हे सुद्धा पहा: भ्रष्ट, साम्राज्य, राज्य, प्रकाश, सोडविणे, धार्मिक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: