mr_tw/bible/other/sweep.md

2.7 KiB

साफ करणे (नाश करणे), उडवून लावणे, वाहून नेणे (घेऊन जाणे), झाडून नेणे

तथ्य:

"साफ करणे" या शब्दाचा अर्थ झाडूने किंवा ब्रशने व्यापक आणि जलद हालचाल करून धूळ काढून टाकणे असा होतो. "साफ केले" हा "साफ करणे" चे भूतकाळी रूप आहे. या संज्ञादेखील लाक्षणिक अर्थाने वापरल्या जाऊ शकतात.

  • "साफ करणे" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने, कसे एखादे सैन्य जलद, निर्णायक, व्यापक-पोहोचण्याच्या हालचाली करते, ह्याचे वर्णन करण्यासाठी केला जातो.
  • उदाहरणार्थ, यशया संदेष्ट्याने असे भाकीत केले की, अश्शुरी लोक यहुदाचे राज्य "साफ करत" जातील. याचा अर्थ ते यहुदाचा नाश करतील आणि त्याच्या लोकांवर कब्जा करतील.
  • "वाहून नेणे" या शब्दाचा उपयोग वेगाने वाहणारे पाणी कसे गोष्टींना दूर ढकलते, त्या पद्धतीचे वर्णन करण्याकरिता सुद्धा केला जातो.
  • जेंव्हा एखाद्या मनुष्यासोबत जबरदस्त, कठीण गोष्टी घडतात, तेंव्हा त्या त्याला "वाहून नेत आहेत" असे म्हंटले जाते.

(हे सुद्धा पहा: अश्शुर, यशया, यहूदा, संदेष्टा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: