5.1 KiB
यशया
तथ्य:
यशया हा एक देवाचा संदेष्टा होता, त्याने यहूदाचे चार राजे राज्य करण्याच्या काळात भविष्यवाणी केली: उज्जीया, योथाम, अहाज, आणि हिज्कीया.
- हिज्कीयाच्या कारकिर्दीदरम्यान, जेंव्हा अश्शूरी लोक जेव्हा शहरावर हल्ला करत होते, त्या काळात तो यरुशलेममध्ये राहात असे.
- जुन्या करारातील यशया नावाचे पुस्तक, हे पवित्र शास्त्रातील अनेक मोठ्या पुस्तकांपैकी एक आहे.
- यशयाने अनेक भविष्यवाण्या लिहिल्या, त्या तो जिवंत असतानाच खऱ्या झाल्या.
- यशया त्याने मसिहाबद्दल लिहिलेल्या भविष्यवाणींसाठी प्रसिद्ध आहे, त्या 700 वर्षानंतर जेंव्हा येशू पृथ्वीवर राहत होता, त्यावेळी पूर्ण झाल्या.
- येशू आणि त्याच्या शिष्यांनी यशयाच्या भविष्यवाण्यांचा उल्लेख, लोकांना मसिहाबद्दल शिकवताना उदाहरणादाखल केला.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: अहाज, अश्शुरी, ख्रिस्त, हिज्कीया, योथाम, यहूदा, संदेष्टा, उज्जीया)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- 2 राजे 20:1-3
- प्रेषितांची कृत्ये 28:25-26
- यशया 01:1
- लुक 03:4
- मार्क 01:1-3
- मार्क 07:6-7
- मत्तय 03:1-3
- मत्तय 04:14-16
पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
-
21:09 यशया संदेष्टयाने भविष्यवाणी केली की मसिहा हा एका कुमारीच्या पोटी जन्म घेईल.
-
21:10 यशया संदेष्टा म्हणाला की मसिहा गालीलमध्ये राहील, निराशामध्ये असलेल्या लोकांचे सांत्वन करील, आणि बंदिवानांना सोडवून स्वातंत्र्याची घोषणा करील.
-
21:11 यशया संदेष्टयाने हेही भाकित केले की मसिहाचा विनाकारण द्वेश केला जाईल व त्याला नाकारले जाईल.
-
21:12 यशयाने भविष्य केले होते की लोक मसिहावर थुंकतील, त्याची थट्टा करतील व त्यास फटके मारतील.
-
26:02 त्यांनी त्यास यशया संदेष्टयाच्या ग्रंथाची गुंडाळी वाचण्यासाठी दिली. येशूने ती गुंडाळी उघडून त्यातील कांही भाग लोकांसमोर वाचला.
-
45:08 जेव्हा फिलिप्प रथाजवळ आला, तेव्हा त्याने तो कूशी यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचत असताना ऐकले.
-
45:10 फिलिप्पाने त्या कूशीस स्पष्टिकरण देत सांगितले की यशया संदेष्टा हे मसिहाविषयी लिहित आहे.
-
Strong's: H3470, G2268