mr_tw/bible/names/uzziah.md

2.6 KiB

उज्जीया, अजऱ्या

तथ्य:

  • उज्जीया यहुदाचा राजा वयाच्या 16 व्या वर्षी बनला आणि त्याने 52 वर्षे राज्य केले, जी एक विलक्षण मोठी कारकीर्द होती. उज्जीयाला "अजऱ्या" म्हणून सुद्धा ओळखले जाते.

  • उज्जीया राजा त्याच्या संघटीत आणि कुशल सैन्यासाठी प्रसिद्ध होता. त्याने शहराच्या संरक्षणासाठी बुरुज बांधले आणि तीर आणि मोठे दगड मारण्यासाठी त्याने खासकरुन तयार केलेली युद्धरूपी शस्त्रे होती.

  • जितके दिवस उज्जीयाने देवाची सेवा केली, तितके दिवस त्याची भरभराट झाली. त्याच्या कारकीर्दीच्या शेवटी, तो गर्विष्ठ बनला आणि त्याने मंदिरामध्ये धूप जाळला, ज्याची परवानगी फक्त याजाकालाच होती, असे करून देवाची आज्ञा मोडली.

  • या पापामुळे, उज्जीया कुष्टरोगाने आजारी पडला आणि त्याला त्याच्या कारकीर्दीच्या शेवटपर्यंत, इतर लोकांच्यापासून वेगळे राहावे लागले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: यहूदा, राजा, कुष्टरोग, कारकीर्द, बुरुज)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: