mr_tw/bible/other/watchtower.md

2.6 KiB

पहारेकऱ्याचा बुरुज (कुंपण), बुरुज

व्याख्या:

"पहारेकऱ्याचा बुरुज" या शब्दाचा संदर्भ, एक जागा म्हणून उंच रचना बांधली जाते, जिच्यावरून पहारेकरी कोणता धोका येतो काय ते पाहू शकतो. हे बुरुज सहसा दगडांच्यापासून बांधले जातात.

  • जमिनीचे मालक काहीवेळा पहारेकऱ्याचा बुरुज बांधतात, ज्याच्यावरून ते त्यांच्या पिकांवर नजर ठेवू शकतात आणि त्यांची चोरी होण्यापासून वाचवू शकतात.
  • त्या बुरुजांमध्ये सहसा एका खोलीचा समावेश असतो, जिथे पहारेकरी किंवा एखादे कुटुंब राहू शकते, जेणेकरून ते त्या पिकांची रक्षा रात्रंदिवस करू शकतील.
  • पहारेकऱ्यांचे बुरुज हे शहराच्या कुंपणभिंतींपेक्षा उंच असतात, जेणेकरून, जर एखादा शत्रू शहरावर हल्ला करण्यासाठी येत असेल तर ते पहारेकरी पाहू शकेल.
  • "पहारेकऱ्याचा बुरुज" या शब्दाचा उपयोग शत्रूंपासूनच्या संरक्षणाचे प्रतिक म्हणून सुद्धा केला जाऊ शकतो. (पहा: रूपक)

(हे सुद्धा पहा: प्रतिस्पर्धी, पाहणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: