mr_tw/bible/other/interpret.md

3.8 KiB

अर्थ सांगणे, अर्थ सांगतो, अर्थ सांगितला, स्पष्ट करून सांगणे (उलगडा), उलगडा करणे, उलगडा सांगणे, दुभाषी (दुभाष्या)

तथ्य:

"अर्थ सांगणे" आणि "उलगडा करणे" या शब्दांचा संदर्भ, एखाद्या गोष्टीला समजून तिचा अर्थ स्पष्ट करणे, जिचा अर्थ स्पष्ट नाही ह्याच्या संबंधात येतो.

  • पवित्र शास्त्रामध्ये, बऱ्याचदा या शब्दांचा उपयोग, स्वप्ने किंवा दर्शन ह्यांचा अर्थ स्पष्ट करण्याच्या संबंधात केला जातो.
  • जेंव्हा बाबेलाच्या राजाला काही गोंधळात टाकणारी स्वप्ने पडली, तेंव्हा देवाने दानीएलाला त्या स्वप्नांचा अर्थ स्पष्ट करून सांगण्यास मदत केली.
  • स्वप्नाचा "उलगडा करणे" ह्याचा अर्थ स्वप्नाच्या अर्थाचे "स्पष्टीकरण" देणे असा होतो.
  • जुन्या करारामध्ये, देवाने काहीवेळा स्वप्नांचा उपयोग भविष्यामध्ये जे घडणार आहे ते लोकांना प्रकट करण्यासाठी केला. म्हणून त्या स्वप्नांचा उलगडा करणे म्हणजे भविष्यवाण्या होत्या.
  • "अर्थ सांगणे" या शब्दाचा संदर्भ इतर गोष्टींचे आकलन करणे ह्याच्या संबंधात देखील येऊ शकतो, जसे की, हवामान किती थंड किंवा उष्ण आहे, ते किती हवेशीर आहे, आणि आभाळ कसे दिसत आहे या आधारावर, हवामान कसे असेल ह्याचे आकलन करणे.
  • "अर्थ सांगणे" या शब्दाचे भाषांतर, "अर्थाचे आकलन करणे" किंवा "स्पष्ट करणे" किंवा "चा अर्थ सांगणे" असे केले जाऊ शकते.
  • "उलगडा करणे" या शब्दाचे भाषांतर "स्पष्टीकरण" किंवा "अर्थ सांगणे" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: बाबेल, दानीएल, स्वप्न, संदेष्टा, दर्शन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: