mr_tw/bible/other/vision.md

3.3 KiB

दृष्टांत

तथ्य:

"दृष्टांत" या शब्दाचा अर्थ असे काहीतरी जो एक व्यक्ती बघतो असा होतो. ह्याचा विशेषकरून संदर्भ काहीतरी वेगळे किंवा अलौकिक ह्याच्याशी येतो, जे देव लोकांना दाखवतो, जेणेकरून तो त्यांना त्यातून काहीतरी संदेश देईल.

  • सहसा, जेंव्हा मनुष्य जागा असतो, तेंव्हा तो दृष्टांत बघतो. तथापि, काहीवेळा, दृष्टांत हा जेंव्हा एखादा मनुष्य झोपेत असतो, तेंव्हा स्वप्नात बघितला जाऊ शकतो.
  • देव लोकांना काहीतरी अत्यंत महत्वाचे सांगण्यासाठी दृष्टांत देतो. उदाहरणार्थ, देवाने पेत्राला दृष्टांत हे सांगण्यासाठी दिला की, त्याने आता परराष्ट्रीयांचे स्वागत करावे.

भाषांतर सूचना

  • दृष्टांत बघितला" या वाक्यांशाचे भाषांतर, "देवापासून काहीतरी वेगळे बघितले" किंवा "देवाने त्याला काहीतरी विशेष दाखवले" असे केले जाऊ शकते.
  • काही भाषेमध्ये कदाचित "दृष्टांत" आणि "स्वप्न" ह्यासाठी वेगवेगळे शब्द नाहीत. म्हणून "दानीएलाला त्याच्या विचारांमध्ये स्वप्ने आणि दृष्टांत मिळाली" अशा वाक्यांचे भाषंतर "दानीएल झोपला असताना स्वप्न बघत होता, आणि देवाने त्याला काही वेगळ्या गोष्टी दाखवल्या" अशा सारखे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: स्वप्न)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: