mr_tw/bible/other/dream.md

4.9 KiB
Raw Permalink Blame History

स्वप्न

व्याख्या:

एक स्वप्न हे असे काहीतरी आहे, जे लोक झोपेत असताना त्यांच्या मनात पाहतात किंवा अनुभव करतात.

  • स्वप्ने पाहताना सहसा असे वाटते की, ती प्रत्यक्षात होत आहेत, पण तसे नसते.
  • काहीवेळा देव लोकांना एखाद्याबद्दल स्वप्न देतो, म्हणजे ते त्यापासून काहीतरी शिकतील. कदाचित तो स्वप्नाद्वारे देखील लोकांशी थेट बोलू शकतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, काही विशिष्ठ लोकांना देवाने विशेष स्वप्न देऊन त्यांना एक संदेश दिला, अनेकदा भविष्यात काय होईल हे सांगणारे स्वप्न.
  • एक स्वप्न हे दर्शनापासून वेगळे आहे. जेंव्हा व्यक्ती झोपलेला असतो, तेंव्हा स्वप्न येतात, पण लोकांना दर्शन सहसा जागेपणी दिसतात.

(हे सुद्धा पहा: दर्शन)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 08:02 आपला पिता याकोब याचे योसेफावर जास्त प्रेम असल्यामुळे व योसेफ आपल्या भावांवर राज्य करील असे स्वप्न त्याला पडल्यामूळे त्याचे भाऊ त्याचा द्वेष करू लागले.

  • 08:06 एके रात्री, फारोला, दोन चिंताजनक स्वप्ने पडली. त्याच्या सल्लागारांपैकी कोणीही त्याला स्वप्नांचा अर्थ सांगू शकला नाही.

  • 08:07 देवाने योसेफाला स्वप्नांचा अर्थ सांगण्याची क्षमता दिली होती, म्हणून फारोने योसेफास तुरूंगातून आपल्या घरी आणले. योसेफाने त्याच्या स्वप्नांचा अर्थ सांगितला व म्हटले, "देव सात वर्षे पुष्कळ पिकपाणी देईल व त्यानंतर सात वर्षे दुष्काळ पडेल.

  • 16:11 म्हणून त्या रात्री तो छावणीकडे गेला व आपणास पडलेले स्वप्न एक मिद्यानी सैनिक आपल्या मित्रास सांगत असल्याचे गिदोनाने ऐकले. त्या सैनिकाचा मित्र म्हणाला, हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य मिद्यानी सैन्यांचा पराभव करील असा होतो!

  • 23:01 तो धार्मीक पुरुष असल्यामुळे मरीयेची बेअब्रु होऊ नये म्हणून त्याने गुप्तपणे तिला सोडण्याची योजना केली. त्याने असे करण्यापूर्वी, एक देवदूत त्याच्या स्वप्नामध्ये आला व त्याच्याशी बोलला.

  • Strong's: H1957, H2472, H2492, H2493, G1797, G1798, G3677