2.7 KiB
2.7 KiB
शिलो
तथ्य:
शिलो हे एक भिंतींची तटबंदी असलेले शहर होते, ज्यावर इस्राएली लोकांनी यहोशवाच्या नेतृत्वाखाली कब्जा केला.
- शिलो हे शहर यार्देन नदीच्या पश्चिमेस आणि बेथेल शहरच्या उत्तरपूर्व दिशेस वसलेले होते.
- यहोशवा इस्राएली लोकांचे नेतृत्व करण्याच्या काळात, शिलो हे शहर इस्राएली लोकांच्या सभेचे ठिकाण होते.
- यहोशवाने इस्राएलाच्या बारा कुळांना, कनानमधील कोणता भाग कोणत्या कुळाला नियुक्त केला गेला आहे हे सांगण्यासाठी, ते सर्व शिलो येथे एकत्र जमले.
- यरुशलेममध्ये मंदिर बांधण्याच्या आधी, शिलो ही जागा होती, जिथे इस्राएली लोक देवाला बलिदान अर्पण करण्यासाठी येत.
- जेंव्हा शमुवेल तरुण मुलगा होता, त्याची आई त्याला शिलो येथे देवाची सेवा करण्याकरिता आणि याजक एली कडून शिक्षण घेण्याकरिता घेऊन गेली.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे
(हे सुद्धा पहा: बेथेल, समर्पण, हन्ना, यरुशलेम, यार्देन नदी, याजक, बलिदान, शमुवेल, मंदिर)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H7886, H7887