mr_tw/bible/names/samuel.md

2.8 KiB

शमुवेल

तथ्य:

शमुवेल हा संदेष्टा आणि इस्राएलाचा शेवटचा शास्ते होता. त्याने शौल आणि दावीद दोघांनाही इस्राएलावर राजा म्हणून अभिषेकित केले.

  • शमुवेल हा रामाच्या गावात एलकाना आणि हन्ना ह्यांच्या घरी जन्माला आला.
  • हन्ना वांझ होती, म्हणून तिने देवाला कळकळीची प्रार्थना केली की, देवाने तिला एक पुत्र द्यावा. शमुवेल हा तिच्या प्रार्थनेचे उत्तर होता.
  • हन्नाने वचन दिले की, जर तिने देवाला एक पुरुष मुलाला जन्माला देण्याची असाध्य विनंती केली असेल, आणि तिची विनंती मान्य झाली असेल, तर ती आपल्या मुलाला यहोवाला समर्पित करेल.
  • देवाला दिलेले तिचे हे वचन पूर्ण करण्यासाठी, जेंव्हा शमुवेल तरुण मुलगा होता, तेंव्हा हन्नाने त्याला एली या मंदिरातील याजकाबरोबर राहण्यासाठी आणि त्याला मदत करण्यासाठी पाठवले.
  • देवाने शमुवेलाला महान संदेष्टा म्हणून वाढवले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: हन्ना, शास्ते, संदेष्टा, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: