mr_tw/bible/names/jordanriver.md

3.3 KiB

यार्देन नदी, यार्देन

तथ्य:

यार्देन नदी, ही नदी आहे जी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते, एक देशाच्या पश्चिम सीमेस तयार करते, ज्याला कनान असे संबोधले जाते.

  • आज, यार्देन नदी इस्राएलाला यार्देन नदीच्या पूर्वेकडे आणि तिच्या पश्चिमेकडे असे वेगळे करते.
  • यार्देन नदी गालीलाच्या समुद्रातून वाहते, आणि नंतर ती मृत समुद्रात जाऊन संपते.
  • जेंव्हा यहोशवाने इस्राएलाचे नेतृत्व कानानमध्ये जाण्यासाठी केले, तेंव्हा त्यांना यार्देन नदी पार करायची होती. सामान्यपणे ती पार करण्यास खूप खोल होती. पण देवाने चमत्कारिकरित्या तिला वाहण्यापासून थांबवले, आणि ते नदीच्या पात्रातून चालत जाऊ शकले.
  • बऱ्याचदा पवित्र शास्त्रामध्ये यार्देन नदीला "यार्देन" असे संदर्भित केले आहे.

(हे सुद्धा पहा: कनान, मृत समुद्र, गालीलाचा समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 15:02 इस्राएलांना वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यासाठी यार्देन नदी पार करणे अगत्याचे होते.

  • 15:03 यार्देन नदी पार केल्यानंतर, देवाने यहोशवास सांगितले की कशा प्रकारे त्यांनी मजबूत यरीहो नगरावर हल्ला करावा.

  • 19:14 अलीशाने नामानास यार्देन नदीमध्ये सात वेळा डुबकी मारण्यास सांगितले.

  • Strong's: H3383, G2446