mr_tw/bible/other/dedicate.md

3.0 KiB

समर्पण, वाहिले, समर्पिलेले, समर्पण करणे

व्याख्या:

समर्पण करणे म्हणजे, एखाद्या विशिष्ठ हेतूसाठी किंवा घटनेसाठी एखाद्या गोष्टीला बाजूला काढणे किंवा ताब्यात देणे.

  • दावीदाने त्याच्याजवळ असणारे सोने आणि चांदी देवाला समर्पित केली.
  • बऱ्याचदा "समर्पण करणे" या शब्दाचा संदर्भ, एखाद्या गोष्टीला विशेष हेतूसाठी बाजूला करण्याच्या औपचारिक घटनेसाठी किंवा समारंभासाठी येतो.
  • वेदीच्या समर्पनामध्ये देवाला बलिदान अर्पण करण्याचा समावेश होतो.
  • नहेम्याने इस्राएली लोकांचे नेतृत्व, यरुशलेमेची दुरुस्त केलेल्या भिंतीच्या समर्पन करण्याकरिता आणि केवळ यहोवाची सेवा करण्याकरता व आपल्या शहराची काळजी घेण्याचे वचन देण्याकरिता केले. या घटनेमध्ये देवाला धन्यवाद, संगीत वाद्य वाजवून आणि गाणी म्हणून देण्याचा समावेश होता.
  • "समर्पण" या शब्दाचे भाषांतर "विशिष्ठ हेतूसाठी विशेष नियुक्त केलेला" किंवा "एखादी गोष्ट विशिष्ठ हेतूसाठी उपयोगात आणण्याकरिता ताब्यात देणे" किंवा "विशिष्ठ कार्य करण्याकरिता एखाद्याला ताब्यात देणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: ताब्यात देणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: