mr_tw/bible/names/midian.md

4.2 KiB
Raw Permalink Blame History

मिद्यान, मिद्यानी

तथ्य:

मिद्यान हा अब्राहाम आणि त्याची पत्नी कटूरा ह्यांचा मुलगा होता. हे कनान भूमीच्या दक्षिणेला आणि उत्तरी अरबी वाळवंटामध्ये स्थित असलेल्या प्रांताचे आणि लोकसमूहाचे देखील नाव होते. त्या समूहातील लोकांना "मिद्यानी" असे म्हणत.

  • जेंव्हा मोशेने पहिल्यांदा मिसर सोडले, तेंव्हा तो मिद्यानच्या प्रांतात गेला, जिथे तो जिथ्रोच्या मुलींना भेटला आणि त्याने त्यांच्या कळपांना पाणी पाजण्यास त्यांना मदत केली. नंतर मोशेने जिथ्रोच्या मुलींपैकी एकीशी विवाह केला.
  • योसेफाला गुलामांच्या मिद्यानी व्यापाऱ्यांच्या समूहाने मिसरला नेले.
  • अनेक वर्षानंतर, मिद्यानी लोकांनी इस्राएली लोक कनानच्या भूमीत असताना त्यांच्यावर हल्ला केला आणि छापा टकला. गिदोनाने त्यांना हरवण्यासाठी इस्राएली लोकांचे नेतृत्व केले.
  • आताच्या युगातील अरबी कुळातील अनेकजण या समुहाचे वंशज आहेत.

(हे सुद्धा पहा: अरब, मिसर, कळप, गिदोन, जिथ्रो, मोशे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:03 पण नंतर इस्त्राएल लोकांना देवाचा विसर पडला व ते पुन्हा मूर्तिपूजा करू लागले. मग देवाने शेजारच्या मिद्यांनी लोकांद्वारे त्यांचा पराभव केला.

  • 16:04 आता इस्त्राएली खूप भयभीत झाले व आपण मिघान्यांच्या हातामध्ये सापडू नये म्हणून ते गुहेमध्ये राहू लागले.

  • 16:11 त्या सैनिकाचा मित्र म्हणाला, हया स्वप्नाचा अर्थ गिदोनाचे सैन्य __ मिद्यानी__ सैन्यांचा पराभव करील असा होतो!

  • 16:14 देवाने मिद्यान्यांना गोंधळून टाकले व त्यामुळे ते आपसांतच एकमेकांवर हल्ले करु लागले व मारु लागले.

  • Strong's: H4080, H4084, H4092