mr_tw/bible/names/gideon.md

5.1 KiB
Raw Permalink Blame History

गिदोन

तथ्य:

गिदोन हा एक इस्राएली मनुष्य होता, ज्याला देवाने इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंपासून सोडवण्यासाठी उभारले होते.

  • गिदोन जगण्याच्या काळामध्ये, मिद्यानी नावाचा लोकसमूह इस्राएल लोकांवर सतत हल्ला करून त्यांच्या पिकांचे नुकसान करत असे.
  • जरी गिदोन घाबरलेला होता, तरी देवाने त्याचा उपयोग, मिद्यानी लोकांच्या विरुद्ध लढून त्यांना पराजित करण्यासाठी इस्राएल लोकांचे नेतृत्व करण्यासाठी केला.
  • गिदोनाने देवाची आज्ञा मानत खोटे देव बाल आणि अशेरा ह्यांच्या वेद्या पाडून टाकल्या.
  • त्याने इस्राएल लोकांचे नेतृत्व फक्त त्यांच्या शत्रूंना हरवण्यासाठीच नाही केले तर यहोवा, एकच खरा देव ह्याच्या आज्ञा पाळण्यासाठी आणि त्याची उपासना करण्यासाठीसुद्धा त्यांना उत्साहित केले.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाल, अशेरा, सोडवणे, मिद्यान, यहोवा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:05 यहोवाचा एक दूत येऊन गिदोनाला म्हणाला, ‘‘हे बलवान वीरा, देव तुझ्याबरोबर आहे. जा आणि इस्त्राएलाला मिद्यान्यांच्या हातातून सोडव.

  • 16:06 गिदोनाच्या पित्याने एका मूर्तीसाठी वेदी बनवली होती. देवाने गिदोनास ती वेदी तोडण्यास सांगितले.

  • 16:08 ते इतके पुष्कळ होते की, ते मोजण्याच्या पलीकडे होते. गिदोनाने इस्त्राएल लोकांस एकत्र बोलावून मिद्यान्यांशी युध्द करण्यास तयार केले.

  • 16:08 गिदोनाने देव आपणास इस्त्राएल लोकांची सुटका करण्यासाठी उपयोग करणार आहे याची खा़त्री पटावी म्हणून देवाकडे दोन चिन्हे मागितली.

  • 16:10 32,000 इस्त्रायली सैनिक गिदोनकडे आले, परंतु देवाने त्याला सांगितले की, ते खूप आहेत.

  • 16:12 मग गिदोन आपल्या सैनिकांकडे परतला व त्याने प्रत्येकास एक शिंग, एक मडके व एक मशाल दिली.

  • 16:15 लोक गिदोनास आपला राजा बनवू पहात होते.

  • 16:16 मग गिदोनाने त्या सोन्यापासून महायाजक घालत असलेल्या वस्त्रासारखे एक विशेष वस्त्र तयार केले. परंतू लोकांनी त्या वस्त्रास एक मूर्ती मानून तिची पूजा ते करु लागले.

  • Strong's: H1439, H1441