mr_tw/bible/other/deliverer.md

6.1 KiB

सोडवणे, सोपवणे, सोडवले, तारले, तारणारा, सुटका केली

व्याख्या:

एखाद्याला ''सोडविणे'' म्हणजे त्या व्यक्तीचा बचाव करणे. "तारणारा" हा शब्द, लोकांना गुलामगिरी, दडपशाही किंवा इतर धोक्यांपासून वाचवणाऱ्या किंवा सोडवणाऱ्या व्यक्तीला सूचित करतो. "सुटका केली" हा शब्द जेंव्हा एखादा व्यक्ती लोकांना गुलामगिरी, दडपशाही किंवा इतर धोक्यापासून वाचवताना किंवा सोडवताना जे घडते त्याला सूचित करतो.

  • जुन्या करारामध्ये, इस्राएल लोकांना वाचवण्यासाठी आणि जे लोक त्यांच्यावर हल्ला करून येतील त्यांच्याविरुद्ध लढाईमध्ये त्यांचे नेतृत्व करण्यासाठी देवाने तारणाऱ्यांना नियुक्त केले.
  • या तारणाऱ्यांना "शास्ते" असेही म्हंटले गेले, आणि जुन्या करारातील शास्ते हे पुस्तक इतिहासाच्या त्या काळाची नोंद ठेवते, जेंव्हा हे शास्ते इस्रायेलावर शासन करीत होते.
  • देवाला सुद्धा "तारणारा" असे म्हंटले आहे. इस्राएल लोकांच्या इतिहासात, त्याने त्याच्या लोकांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली किंवा त्यांना वाचवले.
  • "च्या ताब्यात देणे" किंवा "तिथपर्यंत ताब्यात देणे" या शब्दांचा एखाद्याला शत्रूंच्या ताब्यात देणे असा खूपच वेगळा अर्थ आहे, जसे की, जेंव्हा यहूदाने येशूला यहुदी पुढाऱ्यांच्या ताब्यात दिले.

भाषांतर सूचना

  • लोकांना त्यांच्या शत्रूंच्या हातुन सोडवण्यास मदत करण्याच्या संदर्भात, "सोडवणे" या शब्दाचे भाषांतर "वाचवणे" किंवा "मुक्त करणे" किंवा "बचाव करणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा त्याच्या अर्थ एखाद्याला शत्रूंच्या ताब्यात देणे असा होतो, तेंव्हा "ताब्यात देणे" ह्याचे भाषांतर "ला फसवणे" किंवा "सोपवणे" किंवा "ताब्यात देणे" असे केले जाऊ शकते.
  • "तारणारा" या शब्दाचे भाषांतर "वाचवणारा" किंवा "मुक्त करणारा" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा "तारणारा" हा शब्द शास्तेंच्या संदर्भात येतो ज्यांनी इस्राएलाचे नेतृत्व केले, तेंव्हा ह्याचे भाषांतर "शासक" किंवा "शास्ते" किंवा "पुढारी" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: न्यायाधीश, वाचवणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 16:03 मग देवाने त्यांना एक तारणारा पाठविला ज्याने त्यांना शत्रूंपासून सोडविले व त्यांच्या मध्ये शांती प्रस्थापित झाली.

  • 16:16 शेवटी त्यांनी देवाचीच मदत मागितली व देवाने त्यांना दुसरा तारणारा पाठविला.

  • 16:17 अनेक वर्षापासून, देवाने इस्त्राएली लोकांकडे त्यांना शत्रूंपासून सोडविण्यासाठी अनेक तारणारे पाठविले.

  • Strong's: H579, H1350, H2020, H2502, H3052, H3205, H3444, H3467, H4042, H4422, H4560, H4672, H5337, H5338, H5414, H5462, H6299, H6308, H6403, H6405, H6413, H6475, H6487, H6561, H7725, H7804, H8000, H8199, H8668, G325, G525, G629, G859, G1080, G1325, G1560, G1659, G1807, G1929, G2673, G3086, G3860, G4506, G4991, G5088, G5483