mr_tw/bible/names/manasseh.md

4.1 KiB

मनश्शे

तथ्य:

जुन्या करारांमध्ये मनश्शे नावाचे पाच वेगवेगळे पुरुष होते:

  • मनश्शे हे योसेफाच्या प्रथम जन्मलेल्या मुलाचे नाव होते.

  • मनश्शे आणि त्याचा छोटा भाऊ एफ्राईम या दोघांना योसेफाचा पिता याकोब ह्याने दत्तक घेतले होते, ज्याने त्याच्या वंशजांना इस्राएलाच्या बारा कुळांमध्ये असण्याचा विशेषाधिकार दिला.

  • मनश्शेच्या वंशजांनी इस्राएलाच्या कुळांपैकी एक कुळ बनवले.

  • मनश्शेच्या कुळाला बऱ्याचदा "मनश्शेचे अर्धे कुळ" असे संबोधले जाते, कारण त्याच्या कुळातील काही भाग हा कनानच्या भूमीत, यार्देन नदीच्या पश्चिमेला स्थायिक झाला. * त्या कुळाचा उर्वरित भाग यार्देन नदीच्या पूर्वेला स्थायिक झाला.

  • यहूद्यांच्या राजांपैकी एका राजाचे नाव मनश्शे होते.

  • मनश्शे राजा हा दुष्ट राजा होता, ज्याने स्वतःच्या मुलांचे खोट्या देवांसमोर होमार्पण म्हणून बलिदान केले.

  • देवाने मनश्शे राजाला शत्रू सैन्याच्या हातामध्ये देऊन त्याला शिक्षा केली. मनश्शे देवाकडे वळला आणि जिथे जिथे मूर्तींची उपासना होत होती त्या सर्व वेद्यांचा त्याने नाश केला.

  • मनश्शे नावाचे दोन मनुष्य एज्राच्या काळात राहत होती. त्या मनुष्यांना त्यांच्या मूर्तिपूजक पत्नींना घटस्फोट देणे गरजेचे होते, ज्यांनी त्यांना खोट्या देवांची उपासना करण्यासाठी प्रभावित केले होते.

  • अजून एक मनश्शे हा काही दानच्या लोकांचा आजोबा होता, जे खोट्या देवांचे याजक होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: वेदी, दान, एफ्राईम, एज्रा, खोटे देव, याकोब, यहूदा, मूर्तिपूजक, इस्राएलाची बारा कुळे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: