mr_tw/bible/names/lebanon.md

2.2 KiB

लबानोन

तथ्य:

लबानोन हा एक सुंदर डोंगराळ प्रदेश होता, जो इस्राएलाच्या उत्तरेला, भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून स्थित होता. पवित्र शास्त्राच्या काळात, हा प्रदेश सरुंच्या झाडांनी जसे की, गंधसरू आणि देवदारु यांनी घनदाट होता,

  • शलमोन राजाने मंदीर बांधण्यासाठी उपयोगात येणाऱ्या गांधसरुंच्या झाडांना कापण्यासाठी लबानोनला कामकरी पाठवले.
  • पूर्वीचे लबानोन हे फिनीशियाच्या लोकांचे होते, जे व्यापारी उद्योगासाठी लागणाऱ्या जहाजांचे कुशल कारागीर होते.
  • सोर आणि सीदोन ही शहरे लबानोन मध्ये स्थित होती. ही तीच शहरे होती, ज्यामध्ये मौल्यवान जांभळ्या रंगाचा पहिल्यांदा वापर केला गेला होता.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहाः गंधसरू, देवदारु, सरू, फिनीशिया)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ: