mr_tw/bible/names/ishmael.md

3.6 KiB

इश्माएल, इश्माएली, इश्माएली लोक

तथ्य:

इश्माएल हा अब्राहाम आणि मिसरी दासी हगार ह्यांचा मुलगा होता. जुन्या करारामध्ये इश्माएल नावाचे बरेच इतर पुरुष होते.

  • "इश्माएल" नावाचा अर्थ "देव ऐकतो" असा होतो.
  • देवाने अब्राहामाचा मुलगा इश्माएल ह्याला आशीर्वाद देण्याचे वचन दिले, पण तो हा मुलगा नव्हता ज्याच्याबरोबर देवाने त्याचा करार स्थापन करण्याचे वचन दिले होते.
  • देवाने हगार आणि इश्माएल ह्यांची रक्षा केली जेंव्हा त्यांना वाळवंटात पाठेऊन दिले.
  • जेंव्हा इश्माएल पारानाच्या वाळवंटात राहता होता, तेंव्हा त्याने मिसरी मुलीशी लग्न केले.
  • इश्माएलचा मुलगा नथन्या हा यहुदाचा एक सेनानायक होता, ज्याने बाबेलाचा राजा नबुखद्नेसर ह्याने नियुक्त केलेल्या सुभेदाराला मारण्यासाठी लोकांच्या समूहाचे नेतृत्व केले.
  • जुन्या करारामध्ये इश्माएल नावाचे इतर चार पुरुष होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: अब्राहम, बाबेल, करार, वाळवंट, मिसर, हगार, इसहाक, नबुखद्नेसर, पारान, सारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 05:02 यास्तव अब्रामाने हागारेशी विवाह केला. हागारेपासून अब्रामास पुत्र झाला, व त्याचे नाव त्याने इश्माएल ठेवले.

  • 05:04 मी इश्माएलचेही एक मोठे राष्ट्र करीन, पण माझा करार इसहाकाशी असेल.”

  • Strong's: H3458, H3459