mr_tw/bible/other/servant.md

13 KiB
Raw Blame History

गुलाम, गुलामी, गुलामगिरी, नोकर, दासांनी, दास, दास्य, दासपणा, दास्यत्व, दासी, सेवा करणे, सेवक, सेवा केली, सेवा,

व्याख्या:

"नोकर" या शब्दाचा अर्थ "दास" आणि तो अशा व्यक्तीच्या संदर्भात येतो, जो दुसऱ्या व्यक्तीसाठी एकतर स्वतःच्या इच्छेने किंवा सक्तीने काम करतो. आसपासचा मजकूर सहसा स्पष्ट करतो की एखादा व्यक्ती नोकर आहे किंवा दास आहे. "सेवा करणे" या शब्दाचा अर्थ दुसऱ्यांना मदत करण्यासाठी गोष्टी करणे. ह्याचा अर्थ "उपासना" असाही होतो. पवित्र शास्त्रामध्ये, नोकर आणि दास ह्यामध्ये आताच्या तुलनेने त्या काळी खूप कमी फरक होता. दोन्ही नोकर आणि दास हे त्यांच्या स्वामीच्या घराण्यासाठी महत्वाचे भाग होते आणि पुष्कळ जणांना अगदी कुटुंबातल्या सदस्यांसारखी वागणूक मिळत असे. काहीवेळा एक नोकर त्याच्या स्वामीसाठी आयुष्यभर सेवा करण्याची इच्छा दाखवत असे.

  • एक दास हा एक प्रकारचा नोकर होता जो त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीसाठी तो काम करतो त्याच्या मालकी हक्काचा असायचा. ज्या व्यक्तीने दासाला विकत घेतले असायचे त्याला त्याचा "मालक" किंवा "स्वामी" म्हणून संबोधले जायचे. काही मालकांनी आपल्या दासांना अतिशय निर्दयपणे वागविले, तर इतर मालक त्यांच्या दासांशी सेवक म्हणून तो आपल्या घराचा एक अमूल्य सदस्य आहे म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने वागले.
  • प्राचीन काळी, ज्या व्यक्तीकडून पैसे उसने घेतलेले आहेत, त्यांच्या पैश्याची परतफेड करण्यासाठी काही लोक स्वेच्छेने दास बनत.
  • एका व्यक्तीने पाहुण्यांची सेवा करण्याच्या संदर्भात, या शब्दाचा अर्थ "काळजी घेणे" किंवा "एखाद्याला जेवण वाढणे" किंवा "एखाद्यासाठी जेवण पुरवणे." जेंव्हा येशूने त्याच्या शिष्यांना मासे देऊन लोकांची "सेवा" करण्यास सांगितले, ह्याचे भाषांतर "वाटणे" किंवा "हातात देणे" किंवा देणे" असे केले जाऊ शकते.
  • पवित्र शास्त्रामध्ये, "मी तुमचा दास आहे" या वाक्यांशाचा उपयोग आदर व्यक्त करण्यासाठी आणि उच्च पदाच्या व्यक्तीची सेवा करण्यासाठी चिन्हादाखल होत असे. याचा अर्थ असा नाही की बोलणारा माणूस प्रत्यक्ष सेवक होता.
  • "सेवा" या शब्दाचे भाषांतर संदर्भाच्या आधारावर "ची मदत करणे" किंवा "च्या साठी काम करणे" किंवा "ची काळजी घेणे" किंवा "आज्ञा" असे केले जाऊ शकते.
  • जुन्या करारामध्ये, देवाचे संदेष्ट्ये आणि इतर लोक, ज्यांनी देवाची उपासना केली, अनेकदा त्यांना त्याचे "सेवक" म्हणून संबोधण्यात आले.
  • "देवाची सेवा करणे" याचे भाषांतर " देवाची उपासना करणे आणि आज्ञा मानणे" किंवा "देवाने दिलेल्या आज्ञेचे पालन करणे" असेही केले जाऊ शकते.
  • नवीन करारामध्ये, येशुवर विश्वासाच्या द्वारे जे लोक देवाची आज्ञा पाळतात,त्यांना सहसा "सेवक" म्हंटले जाते.
  • "मेजाची सेवा करणे" म्हणजे जितके लोक त्या मेजासमोर बसलेले आहेत त्यांना जेवण वाढणे, किंवा अधिक सामान्यपणे, "जेवण वाढणे."
  • जे लोक देवाबद्दल दुसऱ्यांना शिकवतात त्यांच्याबद्दल ते देव आणि ज्या लोकांना शिकवतात त्या दोघांची सेवा करतात असे म्हंटले जाते.
  • प्रेषित पौल करिंथच्या ख्रिस्ती लोकांना ते कश्या पद्धतीने जुन्या कराराची "सेवा" करत होते याबद्दल लिहितो. ह्याचा संदर्भ मोशेचे नियम पाळण्याशी आहे. आता ते नवीन कराराची "सेवा" करतात. म्हणजेच, वधस्तंभावर येशूच्या बालीदानांमुळे, येशुंवर विश्वास ठेवणाऱ्यांना देवाला संतुष्ट करण्यासाठी आणि पवित्र जीवन जगण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे सक्षम केले आहे.
  • पौल त्यांची "सेवा" एकतर जुन्या नाहीतर नवीन करारानुसार आहे हे दाखवण्यासाठी त्यांच्या कृत्यांबद्दल बोलतो. याचे भाषांतर "सेवा करत असणे" किंवा "आज्ञा पालन करणे" किंवा "च्या प्रती एकनिष्ठा" म्हणून केले जाऊ शकते.
  • ख्रिस्ती लोकांना "नितीमत्वाचे दास" असेही म्हंटले जाते, हे एक रूपक आहे, जे देवाचे आज्ञापालन करण्याच्या वचनबद्धतेची तुलना दासाची त्याच्या स्वामीची आज्ञा पाळण्याच्या वचनबद्धतेशी केली आहे.

(हे सुद्धा पहा: पाप, गुलाम, घराणे, प्रभू, आज्ञापालन, नीतिमान, करार, कायदा,)

पवित्र शास्त्रामधील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 06:01 जेंव्हा अब्राहाम म्हातारा झाला होता, तेंव्हा त्याचा मुलगा, इसहाक तरूण पुरुष झाला होता. म्हणून अब्राहामाने आपल्या दासांपैकी एका दासाला त्याचे नातेवाईक राहत असलेल्या प्रदेशामध्ये जाऊन आपला मुलगा इसहाक,याच्यासाठी वधू आणण्यास पाठविले.
  • 08:04 गुलामांच्या व्यापा-यांनी योसेफास एका श्रीमंत सरकारी अधिका-यास विकून टाकले.
  • 09:13 मी तुला फारोकडे माझ्या लोकांना मिसराच्या गुलामगिरीतून सोडविण्यासाठी पाठविणार आहे.
  • 19:10 मग एलीयाने प्रार्थना केली,‘‘हे परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक व याकोब यांच्या देवा, इस्त्रायलामध्ये तूच देव आहेस व मी तुझा सेवक आहे हे सर्वांस दाखव.
  • 29:03 ‘‘हा चाकर कर्ज फेडू शकत नसल्यामुळे राजाने म्हटले की, हया मनुष्यास व त्याच्या कुटुंबास गुलाम म्हणून विकून त्याच्या कर्जाची फेड करुन घ्यावी.
  • 35:06 माझ्या पित्याच्या घरामध्ये नोकरचाकारांची खाण्याची चंगळ आहे, आणि मी येथे उपाशी मरतोय.
  • 47:04 ते रस्त्याने चालत असतांना ती गुलाम मुलगी ओरडत राहिली, "ही माणसे परात्पर देवाचे दास आहेत.
  • 50:04 येशूने हेही सांगितले, "सेवक आपल्या धन्यापेक्षा थोर नसतो.

Strong's

  • (Serve) H327, H3547, H4929, H4931, H5647, H5656, H5673, H5975, H6213, H6399, H6402, H6440, H6633, H6635, H7272, H8104, H8120, H8199, H8278, H8334, G1247, G1248, G1398, G1402, G1438, G1983, G2064, G2212, G2323, G2999, G3000, G3009, G4337, G4342, G4754, G5087, G5256