mr_tw/bible/kt/honor.md

3.7 KiB

मान (सन्मान)

व्याख्या:

"मान" आणि "सन्मान" या शब्दांचा संदर्भ एखाद्याला आदर, प्रशंसा किंवा परम आदर देण्याशी आहे.

  • सन्मान हा सहसा अशा एखाद्याला दिला जातो, जो उच्च पदाचा आणि महत्वाचा आहे, जसे की राजा किंवा देव.
  • देवाने ख्रिस्ती लोकांनी एकमेकांचा आदर करावा अशी सूचना दिली.
  • मुलांनी त्यांच्या आई वडिलांचा मान राखावा, त्या मार्गामध्ये त्यांचा आदर करणे आणि त्यांच्या आज्ञा पाळणे ह्यांचा समावेश होतो.
  • "सन्मान" आणि "वैभव" हे शब्द सहसा एकत्र वापरले जातात, विशेषकरून जेंव्हा येशूला संदर्भित केले जाते तेंव्हा. हे कदाचित एकाच गोष्टीला संदर्भित करण्याचे दोन वेगवेगळे मार्ग असू शकतात.
  • देवाचा सन्मान करण्याच्या पद्धतींमध्ये, त्याला धन्यवाद देणे आणि त्याची स्तुती करणे, आणि त्याच्या आज्ञांचे पालन करून आणि तो किती महान आहे हे दर्शवेल अशा पद्धतीने जीवन जगुन त्याला आदर दाखवण्याचा समावेश होतो.

भाषांतर सूचना

  • "सन्मान" ह्याचे भाषांतर करण्याच्या इतर पद्धतींमध्ये, "आदर" किंवा "प्रशंसा" किंवा "उच्च मान" ह्यांचा समावेश होतो.
  • "सन्मान" या शब्दाचे भाषांतर, "विशेष आदर दाखवणे" किंवा " त्याच्या स्तुतीस कारण होणे" किंवा "ला उच्च मान दाखवणे" किंवा "अतंत्य मोल्यवान आहे असे दाखवणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अनादर, वैभव, गौरव, स्तुती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1420, H1921, H1922, H1923, H1926, H1927, H1935, H2082, H2142, H3366, H3367, H3368, H3372, H3373, H3374, H3444, H3513, H3519, H3655, H3678, H5081, H5375, H5457, H6213, H6286, H6437, H6942, H6944, H6965, H7236, H7613, H7812, H8597, H8416, G820, G1391, G1392, G1784, G2151, G2570, G3170, G4411, G4586, G5091, G5092, G5093, G5399