mr_tw/bible/other/praise.md

5.0 KiB

स्तुती, स्तुतीस्तोत्रे, स्तुती केली, स्तुती करणे, स्तुत्य

व्याख्या:

एखाद्याची स्तुती करणे म्हणजे त्या व्यक्तीसाठी प्रशंसा व सन्मान व्यक्त करणे.

  • देव किती महान आहे आणि जगातील सृष्टिकर्ता आणि तारणहार म्हणून त्याने केलेल्या अद्भुत गोष्टींमुळे लोक देवाची स्तुती करतात.
  • देवाची स्तुती करण्यामध्ये अनेकदा त्याने जे केले आहे, त्याबद्दल आभार मानण्याचा समावेश होतो.
  • संगीत आणि गायन अनेकदा देव प्रशंसा करण्याचा एक मार्ग म्हणून वापरले जाते.
  • देवाची स्तुती करणे म्हणजे त्याची उपासना करणे.
  • "स्तुती" या शब्दाचे भाषांतर "च्या बद्दल चांगले बोलणे" किंवा "अत्यंत आदराचे शब्द बोलणे" किंवा "च्या बद्दल चांगल्या गोष्टी बोलणे" असे केले जाऊ शकते.
  • "स्तुती" या नामाचे भाषांतर "बोललेला सन्मान" किंवा "सन्मानाचे भाषण" किंवा "च्या बद्दल चांगल्या गोष्टी बोलणे" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: उपासना)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:13 इस्राएल लोकांनी त्यांना नुकत्याच मिळालेल्या स्वातंत्र्याबद्दल पुष्कळ गीते गाऊन आनंद केला व देवाची स्तुती केली, कारण देवाने त्यांना मिसरी सैन्यांपासून तारले होते.
  • 17:08 दाविदाने हे शब्द ऐकल्यावर लगेच देवाचा धन्यवाद केला व त्याची स्तूती केली, कारण देवाने त्याला हा सन्मान व पुष्कळ आशीर्वाद देण्याचे अभिवचन दिले होते.
  • 22:07 जख-या म्हणला,‘‘परमेश्वराची स्तुती असो, कारण त्याने आपल्या लोकांचे स्मरण ठेविले आहे!
  • 43:13 ते आनंदाने एकत्र देवाची स्तुती करीत आणि त्यांचे सर्व काही समाईक होते.
  • 47:08 त्यांनी पौल व सीला यांना तुरूंगाच्या एकदम आतल्या ठिकाणी ठेवले व त्यांचे पाय खोड्यात अडकवले. तरीही मध्यरात्रीच्या समयी, ते देवाची स्तुती करत होते व गीत गात होते.

Strong's

  • Strong's: H1319, H6953, H7121, H7150, G1229, G1256, G2097, G2605, G2782, G2783, G2784, G2980, G3853, G3955, G4283, G4296