mr_tw/bible/other/dishonor.md

3.7 KiB

तुच्छ लेखणे (अनादर), अनादर, तुच्छ लेखले, लाजीरवाणा (अपमानास्पद)

व्याख्या:

"तुच्छ लेखणे" या शब्दाचा अर्थ, असे काहीतरी करणे जे एखाद्याला अपमानकारक होईल. हे त्या व्यक्तीस निंदा किंवा अपमानास देखील कारणीभूत होऊ शकते.

  • "लाजीरवाणा" हा शब्द अशा कृतीचे वर्णन करतो, जी निंदात्मक आहे किंवा जी एखाद्याला तुच्छ लेखण्यास कारणीभूत होते.
  • काहीवेळा "लाजीरवाणा" ह्याचा उपयोग अशा वस्तूला संदर्भित करण्यासाठी केला जातो, ज्या कश्यासाठी महत्वाच्या नसतात.
  • मुलांनी त्यांच्या आईबापांच्या आज्ञा पाळाव्या अशी आज्ञा दिलेली आहे. जेंव्हा मुले आज्ञा पाळत नाहीत, तेंव्हा ते त्याच्या पालकांचा अनादर करतात. ते त्यांच्या पालकांना अशा पद्धतीने वागवतात, ज्यामुळे त्यांना सन्मान मिळत नाहीत.
  • जेंव्हा इस्राएली लोक खोट्या देवांची उपासना करू लागले, आणि अनैतिक वर्तणूक करू लागले, तेंव्हा इस्राएली लोकांनी देवाचा अनादर केला.
  • येशूला भुत लागले आहे, असे बोलून यहुद्यांनी येशूला तुच्छ लेखले.
  • ह्याचे भाषांतर "सन्मान न करणे" किंवा "अनादराने वागवणे" असे केले जाऊ शकते.
  • "तुच्छ लेखणे" हाय नामाचे भाषांतर "अनादर" किंवा "आदर गमावलेला" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "लाजीरवाणा" या शब्दाचे भाषांतर "सन्माननीय नसलेला" किंवा "लज्जास्पद" किंवा "फायदेशीर नसलेला" किंवा "मौल्यवान नसलेला" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: अपमान, सन्मान)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

Strong's

  • Strong's: H1540, H2490, H2781, H3637, H3639, H5006, H5034, H6172, H6173, H7034, H7036, H7043, G818, G819, G820, G2617