mr_tw/bible/kt/disciple.md

6.4 KiB

शिष्य,

व्याख्या:

"शिष्य" या शब्दाचा अर्थ अशा व्यक्तीला सूचित करतो, जो शिक्षकांबरोबर बराच वेळ घालवतो, त्या शिक्षकांच्या चारित्र्य आणि शिकवानिमधून शिकतो.

  • जे लोक येशूचे अनुसरण करीत असत, त्याचे शिक्षण ऐकत आणि त्यांच्या आज्ञा पाळत असत त्यांना "शिष्य" म्हटले गेले.
  • बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे सुद्धा शिष्य होते.
  • येशूच्या सेवेच्या दरम्यान, तेथे त्याचे अनुसरण करणारे आणि त्याचे शिक्षण ऐकत असलेले अनेक शिष्य होते.
  • येशूने त्यातील बारा शिष्यांना त्याचे जवळचे अनुयायी होण्यासाठी निवडले, हे लोक पुढे जाऊन त्याचे "प्रेषित" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • येशूच्या बारा प्रेषितांना पुढे सुद्धा त्याचे "शिष्य" किंवा "बारा" म्हणून ओळखले जाऊ लागले.
  • येशूचे स्वर्गारोहण होण्याच्या आधी, त्याने त्यच्या शिष्यांना आज्ञा दिली की, इतर लोकांनासुद्धा येशूचे शिष्य कसे बनता येईल ह्याबद्दल शिकवा.
  • जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो आणि त्याने शिकवलेल्या आज्ञा पाळतो, त्याला त्याचा शिष्य असे म्हंटले जाते.

भाषांतर सूचना

  • "शिष्य" या शब्दाचे भाषांतर "अनुयायी" किंवा "विद्यार्थी" किंवा "छात्र" किंवा "शिकाऊ" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • या संज्ञेच्या भाषांतराचा संदर्भ फक्त वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याशीची येणार नाही सुनिश्चित करा.
  • या शब्दाचे भाषांतर "प्रेषित" या शब्दाच्या भाषांतरापेक्षा वेगळे असायला हवे.

(हे सुद्धा पहा: प्रेषित, विश्वास, येशू, योहान (बाप्तिस्मा करणारा) बारा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 30:08 मग त्याने शिष्यांस लोकांना वाढण्यासाठी दिले. शिष्य लोकांना वाढतच राहीले तरी ते अन्न संपले नाही.
  • 38:01 येशूच्या प्रचारकार्यास उघडपणे आरंभ झाल्यानंतर सुमारे तीन वर्षांनी येशूने आपल्या शिष्यांस सांगितले की यरुशलेममध्ये त्यांजबरोबर वल्हांडण साजरा करावा अशी त्याची इच्छा आहे, आणि त्यानंतर तो तेथे मारला जाणार आहे असेही त्याने सांगितले.
  • 38:11 मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथशेमाने म्हटलेल्या ठिकाणी गेला. शिष्यांनी परिक्षेत पडू नये म्हणून येशूने त्यांना प्रार्थना करावयास सांगितले.
  • 42:10 येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "स्वर्गात व पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आले आहे. * म्हणून, तुम्ही जा व सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य बनवा आणि पिता, पुत्र व पवित्र आत्माच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा द्या, आणि मी आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी त्यांना पाळावयास शिकवा.

Strong's

  • Strong's: H3928, G3100, G3101, G3102