mr_tw/bible/names/johnthebaptist.md

5.0 KiB
Raw Blame History

योहान (बाप्तिस्मा करणारा)

तथ्य:

योहान जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र होता. कारण "योहान" हे एक सामान्य नाव होते, त्याला सहसा "बाप्तिस्मा करणारा योहान" असे म्हंटले जाते, जेणेकरून तो इतर योहान नावाच्या लोकांपासून वेगळा आहे हे दिऊन येईल, जसे की प्रेषित योहान.

  • योहान एक संदेष्टा होता, ज्याला देवाने मसिहावर विश्वास ठेवण्याकरिता आणि त्याचे अनुकरण करण्याकरिता लोकांना तयार करण्यास पाठवले होते.
  • योहानाने लोकांना स्वतःची पापे कबूल करून, देवाकडे वळण्यासाठी आणि पाप करणे थांबवण्यासाठी सांगितले, म्हणजे ते मासिहाचा स्वीकार करण्यासाठी तयार होतील.
  • योहानाने लोकांना पाण्याने बाप्तिस्मा दिला, हे ह्याचे चिन्ह होते की, ते त्यांनी केलेल्या पापांबद्दल खिन्न आहेत आणि ते त्यापासून परत फिरत आहेत.
  • योहानाला "बाप्तिस्मा करणारा योहान" असे म्हंटले गेले, कारण त्याने अनेक लोकांना बाप्तिस्मा दिला.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे

(हे सुद्धा पहा: बाप्तिस्मा, जखऱ्या)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 22:02 देवदूत जख-यास म्हणाला,‘‘तुझ्या पत्नीस मुलगा होणार आहे. त्याचे नाव तुम्ही योहान असे ठेवा. तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन, मसिहाच्या आगमनासाठी लोकांची तयारी करील !
  • 22:07 अलीशिबेने आपल्या पुत्रास जन्म दिल्यानंतर, देवदूताने सांगितल्याप्रमाणे जख-या व अलीशिबेने त्याचे नाव योहान असे ठेविले.
  • 24:01 योहान, जख-या आणि अलीशिबा यांचा पुत्र, मोठा होऊन एक संदेष्टा बनतो. तो जंगलामध्ये राहत असे, रानमध व टोळ खात असे आणि त्याची वस्त्रे ऊंटाच्या केसापासून बनविलेली होती.
  • 24:02 योहानाचे भाषण ऐकण्यासाठी अनेक लोक जंगलामध्ये जाऊ लागले. त्याने त्यांस प्रचार केला,‘पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे!
  • 24:06 दूस-या दिवशी येशू योहानाकडून बाप्तिस्मा घेण्यासाठी आला. योहानाने त्यास पाहून म्हटले,‘‘पाहा! जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा.

Strong's

  • Strong's: G910 G2491