mr_tw/bible/kt/forgive.md

7.6 KiB
Raw Blame History

क्षमा करणे, क्षमा करतो, क्षमा केली, क्षमाशीलता, माफ करणे, माफ केले

व्याख्या:

एखाद्याला क्षमा करणे म्हणजे, जरी त्या व्यक्तीने काही अपाय केला असेल तरी, त्या व्यक्तीबद्दल द्वेष न बाळगणे. "क्षमाशीलता" म्हणजे एखाद्याला क्षमा करण्याची क्रिया.

  • एखाद्याला क्षमा करणे ह्याचा अर्थ, सहसा ज्या व्यक्तीने काही चूक केली आहे, त्या व्यक्तीला शिक्षा न करणे.
  • "कर्ज माफ करा" या अभिव्यक्तीमध्ये या संज्ञाचा लाक्षणिकरित्या अर्थ "रद्द करणे" असा केला जाऊ शकतो.
  • जेंव्हा लोक त्यांचे पाप कबूल करतात, देव त्यांना, येशूच्या बलिदानासंबंधीच्या वधस्तंभावरील मृत्युच्या आधारावर क्षमा करतो.
  • येशूने त्याच्या शिष्यांना दुसऱ्यांना क्षमा करण्यास शिकवले, जसे त्याने त्यांना क्षमा केले.

"माफ करणे" या शब्दाचा अर्थ एखाद्याला क्षमा करणे आणि त्याला त्याच्या पापाबद्दल शिक्षा न करणे.

  • या शब्दाचा देखील "क्षमा करणे" असाच अर्थ होतो, पण त्याच्यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तीला शिक्षा न करण्याचा औपचारिक निर्णयाचा समावेश असण्याची शक्यता आहे.
  • न्यायालयामध्ये, एक न्यायाधीश गुन्ह्यामध्ये दोषी आढळलेल्या व्यक्तीला क्षमा करू शकतो.
  • जरी आपण पापामुळे दोषी असलो तरी, त्याने वधस्तंभावर केलेल्या मृत्युच्या बलिदानाच्या आधारावर, येशू ख्रिस्त आपल्याला नरकामध्ये मिळणाऱ्या शिक्षेपासून माफ करतो.

भाषांतर सूचना

  • संदर्भाच्या आधारावर, "क्षमा करणे" याचे भाषांतर "माफ करणे" किंवा "रद्द करणे" किंवा "सोडून देणे" किंवा "(एखाद्याच्या) विरोधमध्ये काहीही न धरणे" असे केले जाऊ शकते.
  • "क्षमाशीलता" या शब्दाचे भाषांतर "न चिडण्याचा सराव करणे" किंवा "(एखाद्याबद्दल) दोषी नसल्याची घोषणा करणे" किंवा "माफीचे कृत्य करणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.
  • क्षमा करण्यासाठीच्या औपचारिक निर्णयासाठी भाषेत एखादा शब्द असेल तर तो शब्द "माफ करणे" च्या भाषांतरासाठी वापरला जाऊ शकतो.

(हे सुद्धा पहा: दोषी)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 07:10 परंतु एसावाने अगोदरच याकोबास क्षमा केली होती, आणि त्यांना एकमेकांना भेटून आनंद झाला.

  • 13:15 मोशे पुन्हा पर्वतावर चढला व त्याने लोकांच्या क्षमेसाठी देवाकडे प्रार्थना केली. देवाने मोशेचे ऐकले व त्यांना क्षमा केली.

  • 17:13 दाविदाने आपल्या पापाविषयी पश्चाताप केला आणि देवाने त्यास __क्षमा __ केली.

  • 21:05 नव्या करारामध्ये देव आपल्या आज्ञा मनुष्यांच्या हृदयावर लिहिल, लोक देवाला वैयक्तीकरित्या ओळखतील,ते त्याचे लोक होतील आणि देव त्यांच्या अपराधांची क्षमा करील.

  • 29:01 एके दिवशी,पेत्राने येशूला विचारले,‘‘प्रभुजी, जेंव्हा माझा भाऊ माझ्याविरुद्ध अपराध करील तेव्हा मी त्यास किती वेळा क्षमा करावी?

  • 29:08 तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व कर्ज तुला सोडिले होते.

  • 38:05 मग येशूने एक प्याला घेऊन म्हटले, ह्यातुन प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. ते अनेकांच्या पापक्षमेसाठी ओतले जात आहे.

  • H5546, H5547, H3722, H5375, H5545, H5547, H7521, G859, G863, G5483