mr_tw/bible/kt/guilt.md

4.1 KiB
Raw Blame History

दोष, दोषी

व्याख्या:

"दोष" या शब्दाचा संदर्भ पाप केलेले असण्याचे किंवा गुन्हा केलेल्याच्या तथ्याशी आहे.

  • "दोषी असणे" म्हणजे नैतिकदृष्ट्या काहीतरी चुकीचे केलेले असणे, म्हणजेच, देवाच्या आज्ञेचे पालन केलेले नसणे.
  • "दोषी" च्या विरुद्धार्थी शब्द "निरपराध" हा आहे.

भाषांतर सूचना

  • काही भाषा "दोष" या शब्दाचे भाषांतर कदाचित "पापाचे वजन" किंवा "पापांची मोजणी" असे करतात.
  • "दोषी असणे" ह्याचे भाषांतर करण्याच्या पद्धतींमध्ये "चुकीचे असणे" किंवा "नैतिकदृष्ट्या काहीतरी चुकीचे केलेले असणे" किंवा "पाप केलेले असणे" अशा अर्थाच्या शब्दांनी किंवा वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: निरपराध, अन्याय, शिक्षा, पाप)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 39:02 त्यांनी येशूविरुद्ध अनेक खोटे साक्षीदार आणले होते. तथापि, त्यांच्या जबानीमध्ये मेळ नव्हता म्हणुन यहूदी पुढा-यांना येशूचा गुन्हा सिद्ध करता आला नाही.

  • 39:11 येशूबरोबर बोलल्यानंतर पिलात बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही. परन्तु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठयाने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका! यावर पिलात उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे! पण ते आणखी मोठयाने ओरडू लागले. तेंव्हा पिलात तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.

  • 40:04 येशूला दोन लुटारुंच्या मधोमध वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यापैकी एकाने येशूची थट्टा केली, परंतू दुसरा म्हणाला,‘‘तू देवाला भित नाही काय? आपण दोषी आहोत, पण हा मनुष्य निर्दोष आहे.

  • 49:10 तुमच्या पापांमुळे तुम्ही दोषी आहात व मरणदंडास पात्र आहात.

  • Strong's: H816, H817, H818, H5352, H5355, G338, G1777, G3784, G5267