mr_tw/bible/other/wolf.md

3.3 KiB

लांडगा, लांडगे, जंगली कुत्री

व्याख्या:

एक लांडगा हा भयंकर, मांस-भक्षी प्राणी आहे, जो जंगली कुत्र्यासारखा असतो.

  • लांडगे सामान्यतः गटांमध्ये शिकार करतात आणि एक चतुर आणि गुपचूप प्रकारे त्यांच्या भक्ष्याची शिकार करतात.
  • पवित्र शास्त्राध्ये, "लांडगे" या शब्दाचा उपयोग लाक्षणिक अर्थाने खोटे शिक्षक किंवा खोटे संदेष्ट्ये ह्यांना संदर्भित करण्यासाठी केला जातो, जे विश्वासणाऱ्यांचा, ज्यांची तुलना मेंढरांशी केलेली आहे, त्यांचा नाश करतात. खोटे शिक्षण लोकांना खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यास भाग पडतात, जे त्यांना हानी पोहोचवते.
  • ही तुलना, मेंढरे ही विशेषकरून लांडग्यांद्वारे हल्ला करून खाण्यासारखी असुरक्षित असतात, या तथ्यावर आधारित आहे.कारण ते कमजोर असतात, आणि स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाहीत.

भाषांतर सूचना

  • या शब्दाचे भाषांतर "जंगली कुत्रे" किंवा "जंगली प्राणी" असे केले जाऊ शकते.
  • जंगली प्राण्यांसाठीचे दुसरे नाव "कोल्हा" किंवा "कोयोट" असे आहे.
  • जेंव्हा ह्याचा लोकांच्यासाठी लाक्षणिक अर्थाने उपयोग केला जातो, तेंव्हा ह्याचे भाषांतर, "दुष्ट लोक जे इतर लोकांना हानी पोहोचवतात, जसे प्राणी मेंढरांच्यावर हल्ला करतात" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: दुष्ट, खोटे संदेष्ट्ये, मेंढरे, शिक्षण)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: