mr_tw/bible/other/falseprophet.md

2.3 KiB

खोटा संदेष्टा, खोटे संदेष्ट्ये

व्याख्या:

खोटा संदेष्टा, म्हणजे अशी व्यक्ती आहे, जो चुकीचा दावा करतो की त्याचा संदेश देवाकडून आला आहे.

  • खोट्या संदेष्ट्याच्या भविष्यवाण्या सहसा पूर्ण होत नाहीत. म्हणजेच, त्या खऱ्या होत नाहीत.
  • खोटे संदेष्ट्ये जे संदेश शिकवतात, ते पवित्र शास्त्रामध्ये जे सांगितले आहे त्याच्या अंशतः किंवा पूर्णपणे विसंगत असतात.
  • या शब्दाचे भाषांतर, "असा मनुष्य जो चुकीचा दावा करतो की, तो देवाचा प्रवक्ता आहे" किंवा "एखादा व्यक्ती जो चुकीचा दावा करतो की, तो देवाचे वचन सांगतो" असे केले जाऊ शकते.
  • नवीन करार असे शिकवते की, शेवटच्या काळात अनेक खोटे संदेष्ट्ये येतील, जे लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना असा विचार करावयास भाग पाडतील की ते देवाकडून आहेत.

(हे सुद्धा पहा: पूर्ण, संदेष्टा, खरे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: