mr_tw/bible/other/tenth.md

3.1 KiB

दहावा भाग, दशमांश, दशांश

व्याख्या:

"दहावा भाग" आणि "दशमांश" या शब्दांचा संदर्भ, एखाद्याचे पैसे, पिके, गुरेढोरे, किंवा इतर मालमत्ता ह्यांचा "दहा टक्के" किंवा "दहा भागातील एक भाग" जो देवाला दिला जातो, ह्याच्या संबंधात येतो.

  • जुन्या करारामध्ये, देवाने इस्राएली लोकांना सूचना दिल्या की, त्यांनी त्यांच्या वास्तूतील दहावा भाग, हा देवाला आभार प्रदर्शनाचे अर्पण म्हणून देण्यासाठी बाजूला काढावा.
  • या अर्पणाचा उपयोग इस्राएलाच्या लेवी गोत्राला आधार देण्यासाठी केला जात होता, जे इस्राएली लोकांची याजक म्हणून आणि निवासमंडपाचा, आणि नंतर मंदिराचासुद्धा काळजीवाहक म्हणून सेवा करत होते.
  • नवीन करारामध्ये, देवाला दशांशची गरज नाही, पण त्याऐवजी त्याने विश्वासणाऱ्यांना उदारपणे आणि आनंदाने गरजू लोकांना मदत करण्याच्या आणि ख्रिस्ती सेवेच्या कामाला आधार देण्याच्या सूचना दिल्या.
  • याचे भाषांतर "दहातील एक" किंवा "दहामधील एक" म्हणून देखील केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: विश्वास, इस्राएल, लेवी, गुरेढोरे, मलकीसदेक, सेवा करणारा, बलीदान, निवासमंडप, मंदिर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: