mr_tw/bible/other/snare.md

4.8 KiB

जाळे, पाश, जाळ्यात, परीक्षा घेणे, सापळा, पाश, पकडले

व्याख्या:

"जाळे" आणि "सापळा" या शब्दांचा संदर्भ उपकरणांशी आहे, ज्याचा उपयोग प्राण्यांना पकडण्यासाठी आणि त्यांना पळून जाण्यापासून थांबवण्यासाठी केला जातो. "जाळे" किंवा "जाळ्यात पकडणे" हे जाळ्याने पकडण्यासाठी आहे, आणि "सापळा" किंवा "सापळ्यात पकडणे" हे सापळा लावून पकडणे असे आहे. पवित्र शास्त्रामध्ये, या शब्दांचा वापर लाक्षणिक पद्धतीने केला जातो, की कसे पाप आणि मोह हे लपविलेले सापळ्यासारखे आहेत जे लोकांना पकडतात आणि त्यांना इजा पोहोचवतात.

  • एक "जाळे" हा एक दोरीचा किंवा तारेचा फास आहे, जो अचानक घट्टपणे ओढला जातो जेंव्हा एखादा प्राणी त्यात पाय टाकतो, त्याचा पाय पकडतो.
  • एक "सापळा" सहसा धातू किंवा लाकडापासून बनवलेला असतो आणि त्याचे दोन भाग असतात, जे प्राण्याला पकडण्यासाठी अचानक आणि ताकदीने एकत्रित बंद होतात म्हणजे तो त्यातून बाहेर निघून जाणार नाही. काहीवेळा एक सापळा हा खोल छिद्र असू शकतो, ज्याला त्यामध्ये काहीतरी पडण्यासाठी बनवलेले असते.
  • सहसा जाळे किंवा सापळा हा लपलेला असतो, म्हणजे त्याचे भक्ष्य अनपेक्षितपणे अडकले जाते.
  • "सापळा लावणे" या वाक्यांशाचा अर्थ, काहीतरी पकडण्यासाठी सापळा तयार करणे असा होतो.
  • "सापळ्यात अडकणे" हा शब्द खोल छिद्रामध्ये किंवा खड्ड्यामध्ये जो खोदलेला असतो आणि प्राण्यांना पकडण्यासाठी लपवलेला असतो त्यात पडण्याला सूचित करतो.
  • ज्या व्यक्तीने पाप करणे सुरू केले आणि थांबवू शकत नाही त्या व्यक्तीला "पापाने फासणे" असे म्हटले जाऊ शकते, जसे की एखाद्या जनावराप्रमाणे पाशात पडल्यानंतर आणि पळून जाऊ शकत नाही.
  • ज्याप्रमाणे एखादा प्राणी जाळ्यात अडकल्याने धोक्यात आणि हानी पोहचू शकते, त्याप्रमाणेच पापाच्या जाळ्यात अडकलेल्या एखाद्या व्यक्तीला त्या पापाद्वारे हानी पोहचू शकते आणि त्याला मुक्त करण्याची आवश्यकता आहे.

(हे सुद्धा पहा: मुक्त, भक्ष्य, सैतान, भुरळ पाडणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: