mr_tw/bible/other/free.md

4.4 KiB

मुक्त करणे, मुक्त केले, सोडवत आहे, स्वातंत्र्य, मुक्तपणे, स्वतंत्र, स्वखुशीने, मुक्तता

व्याख्या:

"मुक्त करणे" किंवा "स्वातंत्र्य" या शब्दांचा संदर्भ गुलामगिरीमध्ये नसण्याशी किंवा इतर प्रकरच्या बंधनात नसण्याशी आहे. "स्वातंत्र्य" ह्यासाठी "मुक्तता" हा दुसरा शब्द आहे.

  • "एखाद्याला मुक्त करणे" किंवा "एखाद्याला मुक्त करा" या अभिव्यक्तींचा अर्थ एखादा व्यक्ती गुलामगिरीत किंवा बंदिवासात पुन्हा राहणार नाही असा मार्ग प्रदान करणे असा होतो.
  • पवित्र शास्त्रामध्ये, कसे येशुमधील विश्वासणारे इथून पुढे पापाच्या अधिपत्याखाली नाहीत हे संदर्भित करण्यासाठी, या शब्दांना बऱ्याचदा लाक्षणिक अर्थाने वापरण्यात आले आहे.
  • "मुक्तता" आणि "स्वातंत्र्य" असणे ह्याचा संदर्भ इथून पुढे मोशेच्या नियमांचे पालन करण्याची गरज नसणे पण त्याऐवजी पवित्र आत्म्याच्या शिक्षणाने आणि मार्गदर्शनाने जगण्यासाठी मुक्त असणे ह्याच्याशी आहे.

भाषांतर सूचना

  • "मुक्त" या शब्दाचे भाषांतर "बांधलेला नाही" किंवा "गुलाम नाही" किंवा "गुलामगिरीत नाही" किंवा "बंधनात नाही" अशा अर्थाच्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.
  • "स्वातंत्र्य" किंवा "मुक्तता" या शब्दाचे भाषांतर "मुक्त असण्याची स्थिती" किंवा "गुलाम नसण्याची स्थिती" किंवा "बंधनात नसणे" अशा अर्थाच्या शब्दाने किंवा वाक्यांशाने केले जाऊ शकते.
  • "मुक्त करा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "मुक्त होण्यास कारणीभूत होणे" किंवा "गुलामगिरीतून वाचवणे" किंवा "बंधनातून मुक्त करणे" असे केले जाऊ शकते.
  • एक मनुष्य ज्याला "मुक्त केले" आहे त्याला "जाऊ दिले" किंवा बंधनातून किंवा गुलामगिरीतून "बाहेर काढलेले" आहे.

(हे सुद्धा पहा: बंधन, गुलाम, दास)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: