3.3 KiB
3.3 KiB
काठी, काठ्या
व्याख्या:
"काठी" या शब्दाचा संदर्भ अरुंद, घन, काठी सारखे हत्यार, ज्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकते. ती कदाचित कमीत कमी एक मीटर लांबीची असावी.
- लाकडी काठीचा उपयोग मेंढपाळांकडून इतर प्राण्यांपासून मेंढरांचे रक्षण करण्यासाठी केला जात होता. ती मेंढरांना परत आणण्यासाठी भटकलेल्या मेंढराकडेही फेकून दिली जात होती.
- स्तोत्रसंहिता 23 मध्ये, दावीद राजा "काठी" आणि "आकडी" या शब्दांचा उपयोग, देवाचे त्याच्या लोकांच्यासाठीचे मार्गदर्शन आणि शिस्त ह्यांना संदर्भित करण्यासाठी करतो.
- एका मेंढपाळाच्या काठीचा उपयोग, जशी मेंढरे काठीच्या खालून जात तशी त्यांची मोजदाद करण्यासाठी सुद्धा होत होता.
- अजून एक रूपकात्मक अभिव्यक्ती, "लोखंडाची काठी" ह्याचा संदर्भ, जे लोक देवाच्या विरुद्ध बंडखोरी करतात आणि दुष्ट गोष्टी करतात, त्यांना देव शिक्षा करेल ह्याच्या संबंधात येतो.
- प्राचीन काळी, मोजदाद करण्याची काठी धातूपासून, लाकडापासून किंवा दगडापासून बनवत होते, आणि त्याचा उपयोग एखाद्या इमारतीची किंवा वस्तूची लांबी मोजण्यासाठी केला जात असे.
- पवित्र शास्त्रामध्ये, लाकडी काठीचा संदर्भ मुलांना शिस्त लावण्याचे साधन म्हणून सुद्धा आलेला आहे.
(हे सुद्धा पहा: आकडी, मेंढरू, मेंढपाळ)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
-
Strong's: H2415, H4294, H4731, H7626, G2563, G4463, G4464