mr_tw/bible/other/proud.md

5.7 KiB
Raw Permalink Blame History

गर्विष्ठ, गर्विष्ठ्पणाने, गर्वाने, अभिमानाने

व्याख्या:

"गर्विष्ठ" आणि "अभिमानाने" या शब्दांचा संदर्भ अशा मनुष्याशी आहे, जो स्वतःला खूप काही समजतो, आणि विशेषकरून, तो दुसऱ्यांपेक्षा चांगला आहे असा विचार करतो.

  • एक गर्विष्ठ मनुष्य सहसा स्वतःच्या चुका मान्य करत नाही. तो नम्र नसतो.
  • दुसऱ्या मार्गाने गर्व देवाची आज्ञा न मानण्याकडे घेऊन जातो.
  • "गर्विष्ठ" आणि "गर्व" हे शब्द सकारात्मक अर्थाने सुद्धा वापरले जाऊ शकतात, जसे की, एखाद्याने जे काही प्राप्त केले त्याचा "अभिमान" असणे आणि आपल्या मुलाबद्दल "गर्व" असणे. "आपल्या कामाचा गर्व बाळगा" या वाक्यांशाचा अर्थ आपले काम व्यवस्थित करण्यामध्ये आनंद मिळवा असा होतो.
  • एखादा त्याने जे काही केले आहे त्याच्याबद्दल गर्विष्ठ न होता अभिमान बाळगू शकतो. काही भाषांमध्ये "गर्व" साठी भिन्न अर्थाचे दोन वेगवेगळे शब्द असू शकतात.
  • "अभिमानी" हा शब्द त्याच्या "उद्धटपणे" किंवा "बढाईखोर" किंवा "आत्म महत्वपूर्ण" या अर्थाबरोबर नेहमीच नकारात्मक असतो.

भाषांतर सूचना

  • "गर्व" या नामाचे भाषांतर "उद्धट" किंवा "घमेंडी" किंवा "आत्म-महत्वपूर्ण" असे केले जाऊ शकते.
  • दुसऱ्या संदर्भामध्ये, "गर्व" ह्याचे भाषांतर "आनंद" किंवा "समाधान" किंवा "सुख" असे केले जाऊ शकते.
  • "अभिमान असणे" ह्याचे भाषांतर "च्या बरोबर आनंदी असणे" किंवा "च्या बरोबर समाधानी असणे" किंवा "(कार्य पूर्ण केल्याबद्दल) आनंदित असणे" असे केले जाऊ शकते.
  • "आपल्या कामाचा गर्व बाळगा" या वाक्यांशाचे भाषांतर "आपले काम व्यवस्थित करण्यामध्ये आनंद मिळवा" असे केले जाऊ शकते.
  • "यहोवाचा अभिमान बाळगा" या अभिव्यक्तीचे भाषांतर "याहोवाने केलेल्या सर्व अद्भुत गोष्टींबद्दल आनंदित व्हा" किंवा "यहोवा किती आश्चर्यकारक आहे ह्याने आनंदी व्हा" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: गर्विष्ठ, नम्र, आनंद)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 04:02 ते खूप गर्विष्ठ होत गेले, व देव काय बोलला याकडे लक्ष दिले नाही.

  • 34:10 तेंव्हा येशू म्हणाला, ‘‘मी तुम्हाला खचित सांगतो, देवाने त्या जकातदाराची प्रार्थना ऐकून त्यास नितिमान ठरविले. परंतू त्याला धार्मिक पुढा-याची प्रार्थना आवडली नाही. देव प्रत्येक गर्विष्ठाला नीच करील, व जो स्वत:ला नम्र बनवितो त्याला देव उंचाविल.

  • Strong's: H1341, H1343, H1344, H1346, H1347, H1348, H1349, H1361, H1362, H1363, H1364, H1396, H1466, H1467, H1984, H2086, H2087, H2102, H2103, H2121, H3093, H3238, H3513, H4062, H1431, H4791, H5965, H7293, H7295, H7312, H7342, H7311, H7407, H7830, H8597, G212, G1391, G1392, G2744, G2745, G2746, G3173, G5187, G5229, G5243, G5244, G5308, G5309, G5426, G5450