mr_tw/bible/other/joy.md

6.7 KiB

आनंद, आनंदी, आनंद करणे, आनंदी होणे,

व्याख्या:

आनंद

"आनंद" हा शब्द हर्ष किंवा तीव्र समाधानाची भावना याला संदर्भित करते. संबंधित शब्द "आनंदी" अशा व्यक्तीचे वर्णन करते ज्याला खूप हर्ष होतो आणि खोल हर्षाने भरलेला असतो.

  • जेव्हा एखाद्या व्यक्तीला चांगल्या गोष्टीचा अनुभव घेत असताना त्या गोष्टीचा खोल अर्थ कळतो तेव्हा त्याला आनंद वाटतो.
  • देवच लोकांना खरा आनंद देतो.
  • आनंद असणे सुखद परिस्थितीवर अवलंबून नाही. आयुष्यात खूप कठीण गोष्टी घडत असतानाही देव लोकांना आनंद देऊ शकतो.
  • कधीकधी घरे किंवा शहरे यासारख्या ठिकाणांना आनंददायक म्हणून वर्णन केले जाते. याचा अर्थ असा की तेथे राहणारे लोक आनंदी आहेत.

आनंद

"आनंद करणे" या शब्दाचा अर्थ हर्ष आणि हर्षित.

  • हा शब्द बऱ्याचदा देवाने केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल खूप आनंदी असण्याला संदर्भित करतो.
  • त्याचे भाषांतर "खूप आनंदी असणे" किंवा "खूप हर्षित असणे" किंवा "आनंदाने पूर्ण होणे" असे म्हणून केले जाऊ शकते
  • जेव्हा मरीया म्हणाली "माझा आत्मा माझ्या तारणाऱ्यात हर्षित होतो," तेव्हा तिचा अर्थ "देव माझ्या तारणाऱ्याने मला खूप आनंदित केले आहे" किंवा "माझ्या तारणकर्त्याने माझ्यासाठी जे केले त्यामुळे मला खूप आनंदीत वाटत आहे."

भाषांतरातील सूचना:

  • "आनंद" या शब्दाचे भाषांतर "आनंदीपणा" किंवा "हर्ष" किंवा "महान आनंद" असे म्हणून देखील केले जाऊ शकते
  • "आनंदी व्हा" या वाक्यांशाचे भाषांतर "आनंद करणे" किंवा "खूप आनंदीत असणे" किंवा "देवाच्या चांगुलपणाबद्दल खूप आनंदी रहा" असे भाषांतर केले जाऊ शकते
  • जो आनंददायी आहे त्याचे वर्णन "खूप आनंदी" किंवा "हर्षित" किंवा “खोल हर्षित" असे म्हणून केले जाऊ शकते
  • "आनंदाचा गजर करणे" यासारख्या वाक्यांशाचे भाषांतर "अशा प्रकारे ओरडणे की तुम्ही किती आनंदी आहात हे दिसेल."
  • "आनंदी शहर" किंवा "आनंदी घर" या शब्दाचे भाषांतर "आनंदी लोक राहतात असे शहर" किंवा "आनंदी लोकांनी भरलेले घर" किंवा “शहर ज्यातील लोक खूप आनंदी आहेत” असे म्हणून अनुवादित केले जाऊ शकते. (पाहा: [रुपक]

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

  • [नहेम्या 08:10]
  • [स्तोत्रसंहीता 048:02]
  • [यशया 56: 6-7]
  • [यिर्मया 15: 15-16]
  • [मत्तय 02: 9-10]
  • [लुक 15:07]
  • [लुक 19: 37-38]
  • [योहान 03:29]
  • [प्रेषितांचे कृत्ये 16:32-34]
  • [रोमकरांस पत्र 05: 1-2]
  • [रोमकरांस पत्र 15:30-32]
  • [गलतीकरांस पत्र 05:23]
  • [फिलिप्पैकरांस पत्र 04: 10-13]
  • [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 01: 6-7]
  • [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 05:16]
  • [फिलमोनास पत्र 01: 4-7]
  • [याकोबाचे पत्र 01:02]
  • [3 योहानाचे पत्र 01: 1-4]

पवित्र शास्त्राच्या कथांमधील उदाहरणे:

  • [33:07] "खडकाळी जमीन असा व्यक्ती आहे जो देवाचे वचन ऐकतो आणि __आनंदाने__त्याचा स्वीकार करतो."
  • [34:04] "देवाचे राज्य देखील एखाद्या शेतात ल लपलेल्या खजिन्यासारखे आहे.. दुसऱ्या माणसाला हा खजिना सापडला आणि नंतर त्याने तो पुन्हा पुरला. तो आनंदाने इतका भरला होता की तो गेला आणि आपल्याकडे असलेले सर्व काही विकले आणि ते पैसे ते शेत खरेदी करण्यासाठी वापरले."
  • [41:07] स्त्रिया भयाने आणि मोठ्या __आनंदाने__भरल्या. शिष्यांना चांगली बातमी सांगण्यासाठी त्या धावल्या.

शब्द संख्या:

  • स्ट्रॉन्गचे: एच 1523, एच 1525, एच 2304, एच 2305, एच 2654, एच 2898, एच 4885, एच 5947, एच 5965, एच 5970, एच 6670, एच 74