mr_tw/bible/other/plague.md

2.4 KiB

पीडा

व्याख्या:

पीडा या घटना आहेत, ज्या जास्त संख्यामध्ये लोकांच्या त्रासास किंवा मृत्यूस कारणीभूत होतात. बऱ्याचदा पीडा या रोग आहेत, जे अतिशय जलदपणे पसरतात, आणि त्या थांबवण्याच्या आधी, अनेक लोकांच्या मृत्यूस कारणीभूत होतात.

  • अनेक पिडांना नैसर्गिक करणे असतात, पण काही पिडांना देव लोकांना त्यांच्या पापासाठी शिक्षा म्हणून पाठवतो.
  • मोशेच्या काळात, देवाने मिसरावर दहा पीडा पाठवल्या, जेणेकरून फारो इस्राएली लोकांना मिसर सोडून जाण्यास सक्ती करील. या पिडांमध्ये, पाण्याचे रक्त बनवणे, शारीरिक आजार, टोळांच्या धाडीने आणि गारपीटीमुळे पिकांचा नाश, तीन दिवस पूर्ण अंधार आणि प्रथम जन्मलेल्या मुलांचा मृत्यू ह्यांचा समावेश होतो.
  • संदर्भावर आधारित, ह्याचे भाषांतर, "व्यापक अपत्ती" किंवा "व्यापक रोग" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: गार, इस्राएल, मोशे, फारो)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: