mr_tw/bible/other/pillar.md

4.4 KiB

खांब, स्तंभ

व्याख्या:

"स्तंभ" या शब्दाचा सहसा संदर्भ मोठ्या उभ्या रचनेशी आहे, जिचा उपयोग छप्पर किंवा इतमारतीचा इतर भाग धरून ठेवण्यासाठी केले जातो. "स्तंभ" ह्याला दुसरा शब्द "खांब" असा आहे.

  • पवित्र शास्त्राच्या काळात, इमारतींना आधार देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्तंभांना सामान्यतः दगडाच्या एका तुकड्यापासून कोरले जात होते.
  • जुन्या करारामध्ये जेंव्हा शिमसोनाला पलीष्टी लोकांनी बंदी केले होते, तेंव्हा त्याने त्यांच्या मूर्तीचे मंदिर, त्याला आधार देणाऱ्या स्तंभांना ढकलून ते मंदिर पडण्यास भाग पडून नष्ट केले.
  • "स्तंभ" या शब्दचा संदर्भ काहीवेळा मोठा दगड किंवा धोंडा ह्याबद्दल येतो, ज्याला ही एक कबर म्हणून चिन्हांकित करण्यासाठी स्मारक म्हणून स्थापन केला जातो, किंवा अशा जागेला चिन्हांकित करण्यासाठी जिथे महत्वाची घटना घडली होती.
  • त्याला खोटा देव दर्शविणारी मूर्ती म्हणून देखील संदर्भित करू शकतो. हे "कोरलेल्या प्रतिमा" ह्यासाठीचे दुसरे नाव असू शकते, आणि त्याचे भाषांतर "पुतळा" असे केले जाऊ शकते.
  • "स्तंभ" या शब्दाचा उपयोग असे काहीतरी ज्याचा आकार स्तंभासारखा आहे ह्याला संदर्भित करण्यासाठी केला जातो, जसे की, "अग्निस्तंभ" ज्याने इस्राएली लोकांचे रात्रीच्या वेळी वाळवंटामधून नेतृत्व केले, किंवा "मिठाचा खांब" जी लोटाची पत्नी बनली, जेंव्हा तिने शहराकडे मागे वळून बघितले.
  • इमारतीला आधार देणारी रचना म्हणून, "स्तंभ" किंवा "खांब" या शब्दांचे भाषांतर "तुळईला आधार देणारा सरळ दगड" किंवा "आधार देणारे दगडाची रचना" असे केले जाऊ शकते.

संदर्भाच्या आधारावर, "स्तंभ" ह्याच्या इतर उपयोगाचे भाषांतर "पुतळा" किंवा "थर" किंवा "उंचावटा" किंवा "स्मारक" किंवा "उंच वस्तुमान" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: पाया, खोटे देव, प्रतिमा)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: