mr_tw/bible/other/image.md

4.1 KiB

मूर्ती, प्रतिमा, कोरीव मूर्ती, कोरीव प्रतिमा, साच्यातील धातूच्या प्रतिमा, प्रतिमा, प्रतिकृती, कोरलेली आकृती

व्याख्या:

हे शब्द सर्व मूर्तींचा उल्लेख करण्यासाठी वापरले जातात, जे खोट्या देवांची पूजा करण्यासाठी बनविण्यात आले आहेत. मूर्तींची पूजा करण्याच्या संदर्भात, "प्रतिमा" हा शब्द "कोरलेल्या प्रतिमा" यांचा हृस्वीत आकार आहे.

  • "कोरलेली प्रतिमा" किंवा "कोरलेली आकृती" ही एक लाकडी वस्तू आहे, जी एखाद्या प्राणी, व्यक्ती किंवा वस्तूसारखी दिसत आहे.
  • "साच्यातील धातूच्या प्रतिमा" ही एक वस्तू किंवा पुतळा आहे, ज्याला धातूला वितळवून आणि त्याला एखाद्या वस्तूच्या, प्राण्याच्या किंवा व्यक्तीच्या साच्यात ओतून बनवले जाते.
  • या लाकडाच्या आणि धातूच्या वस्तूंचा उपयोग खोट्या देवांची उपासना करण्यासाठी केला जातो.
  • "प्रतिमा" हा शब्द जेंव्हा मूर्तींना संदर्भित करतो, तेंव्हा ह्याचा संदर्भ लाकडी किंवा धातूच्या मुर्तीशी येतो.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा मूर्तीला संदर्भित केले जाते, तेंव्हा त्याचे भाषांतर "पुतळा" किंवा "कोरलेली मूर्ती" किंवा "कोरीव धार्मिक वस्तू" असे केले जाऊ शकते.
  • मूळ मजकुरामध्ये जेथे फक्त "प्रतिमा" किंवा "आकृती" असे शब्द येतात तेथे, काही भाषांमध्ये नेहमी वर्णनात्मक शब्दांचा उपयोग करणे हे कदाचित अधिक स्पष्ट होऊ शकते, जसे की, "कोरीव प्रतिमा" किंवा साच्यातील धातूंच्या प्रतिमा."
  • हा शब्द देवाची प्रतिकृती असणे ह्याच्या संदर्भात वापरला जाणाऱ्या शब्दापेक्षा वेगळा आहे हे स्पष्ट होईल ह्याची खात्री करा.

(हे सुद्धा पहा: खोटे देव, देव, खोटे देव, देवाची प्रतिकृती)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: