mr_tw/bible/kt/imageofgod.md

4.2 KiB

देवाचे प्रतिरूप, प्रतिरूप

व्याख्या:

"प्रतिरूप" या शब्दाचा संदर्भ अशा गोष्टीशी आहे, जी दुसऱ्या गोष्टीसारखी दिसते किंवा जो चारित्र्याने किंवा सुगंधाने कोणाएका सारखा असतो. संदर्भाच्या आधारावर, "देवाचे प्रतिरूप" हा वाक्यांश वेगवेगळ्या मार्गांनी वापरला जातो.

  • सुरवातीच्या काळात, देवाने मनुष्य प्राण्याला "त्याच्या प्रतिरुपामध्ये" म्हणजेच "त्याच्या सारखे" बनवले. ह्याचा अर्थ लोकांच्याकडे काही विशिष्ठ वैशिष्ठ्ये आहेत, जी देवाच्या प्रतिरुपाला प्रतिबिंबित करतात, जसे की, भावनांना अनुभवण्याची क्षमता, तर्क करण्याची क्षमता आणि संवाद साधण्याची क्षमता, आणि एक आत्मा जो कायमचा आहे.
  • पवित्र शास्त्र असे शिकवते की, येशू, देवाचा पुत्र, हा "देवाचे प्रतिरूप आहे" म्हणजेच तो स्वतः देव आहे. मनुष्य प्राण्यांसारखी, येशूची निर्मिती केलेली नव्हती. सर्व अनंतकाळापासून देव जो पुत्र ह्याला सर्व ईश्वरीय वैशिष्ठ्ये आहेत, कारण त्याच्याकडे सारखीच मुलतत्वे आहेत जी देव जो बाप ह्याच्याकडे आहेत.

भाषांतर सूचना

  • जेंव्हा येशूला संदर्भित केले जाते, तेंव्हा "देवाचे प्रतिरूप" या शब्दाचे भाषांतर "देवाचे अचूक रूप" किंवा "देवासारखेच मुलतत्व" किंवा "देवासारखाच असणे" असे केले जाऊ शकते.
  • जेंव्हा मनुष्य प्राण्याला संदर्भित केले जाते, तेंव्हा "देवाचे त्यांना त्याचे प्रतिरूप असे बनवले" ह्याचे भाषांतर "देवाने त्यांना त्यांच्यासारखे बनवले" किंवा "देवाने स्वतःसारख्या वैशिष्ट्यांसह त्यांना निर्माण केले" अशा अर्थाच्या वाक्यांशांनी केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: प्रतिरूप, देवाचा पुत्र, देवाचा पुत्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: