mr_tw/bible/other/foundation.md

4.2 KiB

स्थापन करणे (सापडणे), पाया घालणे, संस्थापक, पाया, पाये

व्याख्या:

"स्थापन करणे" या क्रियापदाचा अर्थ बांधणे, निर्माण करणे, किंवा च्या साठी पाया घालणे असा होतो. "पाया घालणे" या वाक्यांशाचा अर्थ च्या आधाराने किंवा च्या आधारावर असा होतो. एक "पाया" हा तळाचा आधार आहे, ज्याच्यावर काहीतरी बांधले किंवा निर्माण केले जाते.

  • एखाद्या घराचा किंवा इमारतीचा पाया हा मजबूत असला पाहिजे आणि संपूर्ण रचनेला आधार देण्यासाठी त्याच्यावर अवलंबून राहला आले पाहिजे.
  • "पाया" या शब्दाचा संदर्भ काश्याची तरी सुरवात किंवा अशी वेळ जेंव्हा काहीतरी पहिल्यांदा निर्माण केले होते, ह्यासाठी येतो.
  • लाक्षणिक अर्थाने, ख्रिस्तामधील विश्वासनाऱ्यांची तुलना इमारतीशी केली जाते, जिचा पाया प्रेषितांच्या आणि संदेष्ट्यांच्या शिक्षणावर घातला आहे, त्याबरोबर ख्रिस्त स्वतः त्या इमारतीची कोनशीला आहे.
  • "पायाचा दगड" हा एक दगड आहे, ज्याला पायाचा एक भाग म्हणून घातला जातो. संपूर्ण इमारतीला आधार देण्यासाठी हे दगड मजबूत आहेत ह्याची खात्री करण्यासाठी हे दगड तपासले होते.

भाषांतर सूचना

  • "जगाचा पाया घालण्यापूर्वी" या वाक्यांशाचे भाषांतर "जगाच्या निर्मितीच्या पूर्वी" किंवा "जग पहिल्यांदा अस्तित्वात येण्याच्या वेळेच्या आधी" किंवा "सर्वकाही पहिल्यांदा निर्माण करण्याच्या आधी" असे केले जाऊ शकते.
  • "च्या वर पाया घालणे" या शब्दाचे भाषांतर "च्या वर सुरक्षित बांधलेले" किंवा "च्या वर घट्टपणे आधारित असलेले" असे केले जाऊ शकते.
  • संदर्भाच्या आधारावर, "पाया" याचे भाषांतर "मजबूत तळ" किंवा "भक्कम आधार" किंवा "सुरवात" किंवा "निर्मिती" असे केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पहा: कोनशीला, निर्माण करणे)

पवित्र शास्त्रातील संदर्भ: